सिल्लोडमध्ये खुनाचा थरार…: प्रेमविवाहाला विरोध; बहिणीला शोधत आलेल्या दोन भावांनी ‘दाजी’च्या ‘दाजी’ला संपवले!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : सिल्लोड तालुक्‍यातील डोंगरगावची रात्रीची शांतता रविवारी (२० ऑक्‍टोबर) आक्रोश आणि किंकाळ्यांनी भेदली. बहिणीच्या प्रेमविवाहाला विरोध असलेल्या दोन भावांनी तिचा आणि तिच्या पतीचा शोध घेत डोंगरगाव गाठले. मात्र तिथे दोघेही मिळून आले नाही. दोघे कुठे आहेत, अशी विचारणा करत त्‍यांनी दिसेल त्‍याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. मध्यस्थी करत त्‍यांची समजूत काढणाऱ्याला […]

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : सिल्लोड तालुक्‍यातील डोंगरगावची रात्रीची शांतता रविवारी (२० ऑक्‍टोबर) आक्रोश आणि किंकाळ्यांनी भेदली. बहिणीच्या प्रेमविवाहाला विरोध असलेल्या दोन भावांनी तिचा आणि तिच्या पतीचा शोध घेत डोंगरगाव गाठले. मात्र तिथे दोघेही मिळून आले नाही. दोघे कुठे आहेत, अशी विचारणा करत त्‍यांनी दिसेल त्‍याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. मध्यस्थी करत त्‍यांची समजूत काढणाऱ्याला त्‍यांनी चाकूने भोसकून यमसदनी पाठवले. त्‍यानंतर मोटारसायकलीवरून पसार झाले. शंकर गजानन टटवारे (वय ३०, रा. खंडवा मध्यप्रदेश, ह. मु. डोंगरगाव ता. सिल्लोड) असे हत्‍या झालेल्याचे नाव आहे. त्‍यांची पत्‍नी पूजा शंकर टटवारे (वय २५) गंभीर जखमी झाली आहे.

अतिष फुलचंद नागणे, अमोल फुलचंद नागणे, सविता प्रल्हाद गायकवाड (सर्व रा. चंदनझिरा ता. जि. जालना) अशी संशयित खुन्यांची नावे आहेत. त्‍यांच्याविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी सोमवारी सायंकाळी (२१ ऑक्‍टोबर) गुन्हा दाखल केला असून, अमोल व सविताला अटक केली आहे. अतिष अद्याप फरारी आहे. मृतक शंकर यांचा साला सुनील संजय सोनवणे (रा. डोंगरगाव) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. शंकर टटवारे यांचा दुसरा साला अनिल संजय सोनवणे हा ५ वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथील कंपनीत कामाला आहे. त्याचे जालन्याच्या चंदनझिरा येथील सुनीता नागणेसोबत प्रेम होऊन दोघांनी प्रेमविवाह केला. या विवाहाला नागणे कुटुंबाचा विरोध होता. त्‍यातच आठ महिन्यांपासून पती-पत्नीत पटत नसल्याने सुनीता माहेरी चंदनझिरा येथे गेली होती. तिला आणण्यासाठी अनिल रविवारी दुपारी चंदनझिरा येथे गेला. तिथे सुनिताला सोबत नेण्यावरून सासरच्या लोकांसोबत त्याचे भांडण झाले. तरीही तो सुनिताला घेऊन छत्रपती संभाजीनगरला निघून गेला.

सुनिताला पाठवायचे नव्हते तरीही अनिलने नेल्याचे कळताच अनिलचे साले अतिष नागणे, अमोल नागणे व साली सविता (सर्व रा. चंदनझिरा) खवळले. त्यांनी लगेचच दोघांचा शोध सुरू केला. दोघांना शोधत सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे आले. मात्र तिथे दोघे नव्हते. घरात अनिलचा भाऊ सुनील, वडील संजय व दाजी शंकर व बहीण पूजा असे चौघे होते. अतिष, अमोल आणि सविता यांनी या चौघांना मारहाण सुरू केली. अनिल कुठे आहे, त्याला बाहेर काढा, असे म्हणून ते शिवीगाळ करू लागले. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी अनिलचे दाजी शंकर व बहीण पूजा सरसावले असता तिघांनी त्‍यांना मारहाण करत चाकूने भोसकायला सुरुवात केली. शंकर यांच्या पोटात व छातीत चाकूचे सपासप वार केले. पूजावरही चाकूहल्ला केला. यात शंकर आणि पूजा हे पती-पत्‍नी गंभीर जखमी झाल्याने त्‍यांना आधी सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात व नंतर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलवले. उपचारादरम्‍यान मध्यरात्री १२ ला शंकर यांचा मृत्‍यू झाला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software