- News
- जिल्हा न्यूज
- सावकार महिलेच्या त्रासाला कंटाळून २९ वर्षीय शेतकऱ्याने शेतातच विष पिले!; सुसाईड नोटमुळे समोर आली धक्...
सावकार महिलेच्या त्रासाला कंटाळून २९ वर्षीय शेतकऱ्याने शेतातच विष पिले!; सुसाईड नोटमुळे समोर आली धक्कादायक छळकहानी, जिल्हाभर संताप, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आडगाव खुर्दची आहे घटना
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बहिणीच्या लग्नासाठी सावकार महिलेकडून व्याजाने घेतलेली ५ लाखांची रक्कम दुप्पट झाली. ती देऊनही मात्र सावकार महिलेने शेतजमीन परत नावावर करून देण्यास नकार दिला. उलट आणखी पैसे मागितले. त्यामुळे नैराश्य आलेल्या २९ वर्षीय शेतकऱ्याने शेतात विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आडगाव खुर्द येथे समोर आली आहे. या […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बहिणीच्या लग्नासाठी सावकार महिलेकडून व्याजाने घेतलेली ५ लाखांची रक्कम दुप्पट झाली. ती देऊनही मात्र सावकार महिलेने शेतजमीन परत नावावर करून देण्यास नकार दिला. उलट आणखी पैसे मागितले. त्यामुळे नैराश्य आलेल्या २९ वर्षीय शेतकऱ्याने शेतात विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आडगाव खुर्द येथे समोर आली आहे. या प्रकरणात गुरुवारी (२४ ऑक्टोबर) शेतकऱ्याच्या भावाने करमाड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सावकार महिला आणि तिच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
ज्ञानेश्वर नोकरीनिमित्त इंदौर येथे असताना १५ दिवसांपूर्वी गणेशने त्याला कॉल करून सांगितले होते, की मला सुरेश इत्थर भेटला होता. तो म्हणाला की, तू मला आणखी २ लाख रुपये दिले तर मी तुमची जमीन तुम्हाला परत करायला सांगतो. नसता तुम्ही कुठेही गेले आणी काहीही केले तरी आम्ही तुम्हाला तुमची जमीन करून देत नाही, अशा धमक्या देत असल्याबाबत गणेशने ज्ञानेश्वरला सांगितले होते.
२२ ऑक्टोबरला गणेशने पत्नीच्या मोबाइलवरून ज्ञानेश्वरला दोन- तीन वेळा कॉल केला.
मात्र ज्ञानेश्वरने कामात असल्याने त्याला नंतर बोलतो असे म्हणून फोन कट केला होता. त्यानंतर त्यांचा चुलत भाऊ विजय कुंडलीक ठोंबरे यांनी ज्ञानेश्वरला फोन करून सांगितले की, गणेश याने औषध घेतले आहे. त्याला आम्ही घाटी रुग्णालयात आणले आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर लगेचच इंदौरवरून छत्रपती संभाजीनगरला आला. २३ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता ज्ञानेश्वरला कळले, की २२ ऑक्टोबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास गणेशने शेतात पिकावर फवारणी करण्याचे विषारी औषध पिले. त्या ठिकाणी त्याचा शर्ट लटकविलेला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तेव्हा त्याच्या शर्टच्या खिशामध्ये एक हस्तलिखीत चिठ्ठी मिळून आली. ती चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली असल्याचे कळले. गणेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर गावात अंत्यविधी करण्यात आले.
चिठ्ठीत लिहिले होते…
“आत्महत्या करण्यास कारण सावकारकी संगीता शिवाजी दांडगे वरुड काजी सुरेश इथ्थर लाडगाव यांनी माझ्याकडून 9,70,000 रुपये घेऊन परत 1,40,000 रुपये, माझ्याकडून सुरेश इथ्थरने 1,90,000 रुपये घेतले आणि माझी जमीन काही माझ्या नावे करत नाही, हे दोघे माझ्या मृत्यूस कारणीभूत आहे, दुसरे कुणीही नाही. असा मजकूर लिहिलेला व खालच्या बाजूस गणेश याची स्वाक्षरी आहे.
ज्ञानेश्वरने दिली तक्रार…
गणेशने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी वाचल्यानंतर संगीता शिवाजी दांडगे रा. वरुड काजी ता. छ. संभाजीनगर व तिचा व्यवहार बघणारा सुरेश इत्थर रा. लाडगाव ता. छत्रपती संभाजीनगर यांच्यामुळेच गणेशने आत्महत्या केल्याचे समोर आल्याने ज्ञानेश्वरने करमाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी संगीता शिवाजी दांडगे व सुरेश इत्थर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भारत निकाळजे करत आहेत.

