सकाळी पंढरपूरच्या वारीतून परतला, दुपारी रस्ता ओलांडताना स्‍कूलबसने चिरडले!; सिल्लोड तालुक्‍यातील दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : पेट्रोलपंपाकडून मोटारसायकलीने रस्ता ओलांडत असताना भरधाव स्कूलबसने उडवल्याने तरुणाचा मृत्‍यू झाला. सकाळी पंढरपूरच्या वारीतून परतला अन्‌ दुपारी असा अपघाती मृत्‍यू झाल्याने हळहळ व्‍यक्‍त होत आहे. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (१९ जुलै) दुपारी तीनच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर- जळगाव महामार्गावरील केऱ्हाळा फाट्याजवळील पेट्रोलपंपासमोर घडली. संदीप पोपट बिडवे (वय २८, रा. पळशी, ता. सिल्लोड) […]

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : पेट्रोलपंपाकडून मोटारसायकलीने रस्ता ओलांडत असताना भरधाव स्कूलबसने उडवल्याने तरुणाचा मृत्‍यू झाला. सकाळी पंढरपूरच्या वारीतून परतला अन्‌ दुपारी असा अपघाती मृत्‍यू झाल्याने हळहळ व्‍यक्‍त होत आहे. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (१९ जुलै) दुपारी तीनच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर- जळगाव महामार्गावरील केऱ्हाळा फाट्याजवळील पेट्रोलपंपासमोर घडली.

संदीप पोपट बिडवे (वय २८, रा. पळशी, ता. सिल्लोड) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. अपघाताला कारणीभूत स्‍कूल बस सिल्लोडकडून निल्लोड फाट्याकडे जात होती. त्‍याचवेळी दुचाकीत पेट्रोल भरून संदीप रस्ता ओलांडत होता. अपघाताचा आवाज येताच नागरिकांनी धाव घेतली. संदीपला सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अपघाताची वडोदबाजार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. संदीप पंधरा दिवसांपूर्वी पंढरपूरच्या वारीत गेला होता. शुक्रवारी सकाळी तो घरी परत आला. दुपारी त्याचा असा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी तर एक अडीच वर्षांची मुलगी आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software