- News
- जिल्हा न्यूज
- शेतीवस्तीवर दरोडा, वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत दागिन्यांची लूट, पैठण तालुक्यातील खळबळजनक घटना, व...
शेतीवस्तीवर दरोडा, वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत दागिन्यांची लूट, पैठण तालुक्यातील खळबळजनक घटना, वैजापूर तालुक्यात पारेश्वर मंदिराच्या दानपेट्या लांबवल्या!
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : विहामांडवा (ता. पैठण) शिवारातील वडगाव रस्त्यालगतच्या शेतवस्तीवरील दोन घरांवर मंगळवारी (११ डिसेंबर) मध्यरात्री दरोडा पडला. दहा ते १२ दरोडेखोरांनी दाम्पत्याला बेदम मारहाण करून दोन महिलांच्या गळ्यातील सोने-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. अण्णासाहेब अंबादास बर्डे (वय ६५) हे पत्नी लक्ष्मीबाई यांच्यासह शेतवस्तीवर पत्र्याच्या घरात राहतात. मंगळवारी संध्याकाळी दाम्पत्य […]
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : विहामांडवा (ता. पैठण) शिवारातील वडगाव रस्त्यालगतच्या शेतवस्तीवरील दोन घरांवर मंगळवारी (११ डिसेंबर) मध्यरात्री दरोडा पडला. दहा ते १२ दरोडेखोरांनी दाम्पत्याला बेदम मारहाण करून दोन महिलांच्या गळ्यातील सोने-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला.
दरोडेखोरांच्या मारहाणीत अण्णासाहेब बर्डे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील व कानातील सोने काढत असताना कानाला गंभीर जखम झाली. याघटनेमुळे शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांत भीती पसरली असून, पोलिसांनी ग्रामीण भागात गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
पालखेडच्या मंदिरातील दानपेट्या लांबवल्या…
चोरट्यांनी देवालाही सोडले नाही. वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील पारेश्वर महादेव मंदिरातील दानपेट्या चोरून नेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. आठ दिवसांपूर्वी पारेश्वर महादेवाची यात्रा भरली होती. यात्रा झाल्यानंतर दानपेट्या उघडण्यात येतात. या दानपेट्या उघडण्याआधीच चोरट्यांनी लांबवल्या. मंदिराचे महंत स्वामी महिंद्रगिरीजी महाराज मंदिराशेजारील खोलीत झोपलेले होते. सकाळी त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात आले. गावालगतच्या ओढ्याजवळ मोठी दानपेटी आढळली आहे. मात्र त्यातील रक्कम लंपास केलेली आहे. दुसरी दानपेटी आढळली नाही. मंदिराचे सचिव नंदकिशोर जाधव यांच्या तक्रारीवरून दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

