शेतातून जनावरांना चारा आणतो म्‍हणून गेलेल्या शेतकऱ्याचा मध्यरात्री विहिरीत आढळला मृतदेह!, गंगापूरची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : महेबूबखेडा (ता. गंगापूर) येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (२२ डिसेंबर) सकाळी समोर आली. अकबर मदेखाँ पठाण (वय ४४, रा. महेबूबखेडा) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. अकबर पठाण रविवारी लासूरस्टेशन येथील आठवडे बाजार करून घरी आले. शेतातून जनावराला चारा घेऊन येतो, असे सांगून सायंकाळी पाचला शेतात गेले. […]

गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : महेबूबखेडा (ता. गंगापूर) येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (२२ डिसेंबर) सकाळी समोर आली. अकबर मदेखाँ पठाण (वय ४४, रा. महेबूबखेडा) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे.

अकबर पठाण रविवारी लासूरस्टेशन येथील आठवडे बाजार करून घरी आले. शेतातून जनावराला चारा घेऊन येतो, असे सांगून सायंकाळी पाचला शेतात गेले. रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाही. त्‍यामुळे नातेवाईकांनी शोध घेतला असता आगाठाण शिवारातील विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना दिसला. घटनेची माहिती शिल्लेगाव पोलिसांना मिळाल्यानंतर त्‍यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मध्यरात्री मृतदेह विहिरीबाहेर काढून सोमवारी लासूर स्टेशन येथील आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली. नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद शिल्लेगाव पोलिसांनी केली असून, आत्‍महत्‍येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. अकबर पठाण यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software