- News
- जिल्हा न्यूज
- शिवशाही बसमध्ये ३३ वर्षीय महिलेवर वाहकाचा बलात्कार!, गंगापूर तालुक्यातील घटना; कन्नडमध्ये १७ वर्षी...
शिवशाही बसमध्ये ३३ वर्षीय महिलेवर वाहकाचा बलात्कार!, गंगापूर तालुक्यातील घटना; कन्नडमध्ये १७ वर्षीय मुलीसोबत घरात घुसून अश्लील चाळे, वाळूज MIDCमध्ये ३० वर्षीय महिलेच्या घराच्या टेरेसवर लपलेल्या वासनांधाला नागरिकांनी चोपले!!
गंगापूर/कन्नड/छ. संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत भानसवाडी शिवारात शिवशाही बसमध्ये ३३ वर्षीय महिलेवर वाहकानेच बलात्कार केला. कन्नड तालुक्यातील निमडोंगरी येथे २८ वर्षीय तरुणाने १७ वर्षीय मुलीसोबत घरात घुसून अश्लील चाळे केले, तर छत्रपती संभाजीनगरातील शहरातील वाळूज एमआयडीसीत ३० वर्षीय महिलेची छेड काढणाऱ्या वासनांधाला जमावाने चोप दिला… छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या […]
गंगापूर/कन्नड/छ. संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत भानसवाडी शिवारात शिवशाही बसमध्ये ३३ वर्षीय महिलेवर वाहकानेच बलात्कार केला. कन्नड तालुक्यातील निमडोंगरी येथे २८ वर्षीय तरुणाने १७ वर्षीय मुलीसोबत घरात घुसून अश्लील चाळे केले, तर छत्रपती संभाजीनगरातील शहरातील वाळूज एमआयडीसीत ३० वर्षीय महिलेची छेड काढणाऱ्या वासनांधाला जमावाने चोप दिला… छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या घटनांनी शुक्रवारी (३० ऑगस्ट) नागरिकांच्या संतापात आणखी भर पाडली.
कन्नड : १७ वर्षीय मुलगी घरात एकटी पाहून मागील दाराने घरात घुसून ‘तू मला आवडतेस’ असे म्हणत २८ वर्षीय तरुणाने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. ही घटना कन्नड तालुक्यातील निमडोंगरी (ता. कन्नड) येथे शुक्रवारी (३० ऑगस्ट) दुपारी दीडच्या सुमारास घडली. शुभम सुभाष लहाणे (२८, रा. निमडोंगरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरुध्द कन्नड ग्रामीण पोलिसांनी पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दोघेही एकाच गावातील असल्याने मुलीच्या घराची सर्व माहिती शुभमला होती. मुलीचे वडील हे बाहेरगावी तर आई शेतात कामाला गेलेली होती. मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून तो घरात घुसला. त्याने मुलीसोबत अश्लील चाळे सुरू करताच तिने घाबरून आरडाओरड सुरू केली. आवाज ऐकून शेजारी असलेली तिची आजी व चुलत भाऊ घरात आले. तोपर्यंत शुभम घराच्या मागच्याच दाराने पसार झाला. मुलीने आई-वडिलांसोबत कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. अधिक तपास केला जात आहे.
वाळूज एमआयडीसीत ३० वर्षीय महिलेची छेड
वाळूज एमआयडीसीत राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेचा पाठलाग करून छेड काढणाऱ्या २७ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर रूपचंद डोंगरे (वय २७) असे संशयिताचे नाव आहे. तक्रारदार महिला कामानिमित्त घराबाहेर पडली की किशोर तिचा पाठलाग करून छेड काढत होता. तिने विरोध केला असता जीवे मारण्याची धमकी दिली होती. गुरुवारी (२९ ऑगस्ट) रात्री ११:४५ वाजता महिला व तिची मुलगी वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून घरी परतली असता तिच्या घराच्या टेरेसवर किशोर लपून बसलेला होता. महिलेने आरडाओरड करताच लोक जमा झाले. त्यांनी किशोरला चांगलाच चोप दिला.

