शरद पवार यांची सभा आणि मनोज जरांगे यांच्या आवाहनामुळे गंगापुरात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात उत्‍साह!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : गंगापूर मतदारसंघात निष्ठावंतांची नाराजी कायम असल्यामुळे आणि ठाकरे गटासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी प्रचारापासून दूर राहत असल्याने शरद पवार गट चिंतित होता. मात्र रविवारी गंगापुरात झालेली शरद पवार यांची सभा आणि मनोज जरांगे यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत पाडण्याचा सूचक इशारा दिल्याने शरद पवार गटाच्या समर्थक, कार्यकर्त्यांत उत्‍साह संचारला […]

गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : गंगापूर मतदारसंघात निष्ठावंतांची नाराजी कायम असल्यामुळे आणि ठाकरे गटासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी प्रचारापासून दूर राहत असल्याने शरद पवार गट चिंतित होता. मात्र रविवारी गंगापुरात झालेली शरद पवार यांची सभा आणि मनोज जरांगे यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत पाडण्याचा सूचक इशारा दिल्याने शरद पवार गटाच्या समर्थक, कार्यकर्त्यांत उत्‍साह संचारला आहे.

भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण होत असल्याने मनोज जरांगे यांनी स्‍पष्ट भूमिका व्यक्‍त केली आहे. त्‍यात त्‍यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. त्‍यामुळे पुन्हा एकदा भाजपविरोधात त्‍यांनी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. आरक्षणासाठी कोण धावून येतोय ते पाहून समाजाने कोणाला मतदान करावयाचे हे निश्‍चित करावे, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला लाभ झाला होता. विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याचे मनोज जरांगे यांनी आधी ठरवले होते. मात्र नंतर त्‍यांचा विचार बदलला. त्‍यांनी समाजाच्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याचे आदेश दिले. आता त्‍यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. त्‍यामुळे शरद पवार गटात आनंदाचे वातावरण आहे. त्‍यातच गंगापूरमध्ये शरद पवार यांनी सभेतून कार्यकर्त्यांत स्‍फुरण भरले. मतदारसंघात परिवर्तन आणायचे आवाहन केले.

समाजात दोन मतप्रवाह…
दरम्‍यान, मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानंतर मतदारसंघात दोन प्रवाह दिसून येत आहेत. लोकसभा निवडणुकीत समाजाने मराठवाड्यात भाजपचा सुपडा साफ केला. मात्र ज्‍यांना निवडून दिले, त्‍यांनी नंतर आरक्षणाबद्दल शब्‍दही काढलेला नाही. विशेष म्‍हणजे या भूमिकेचा ज्‍यांना थेट फायदा होत आहे, त्‍या शरद पवार गट आणि महाविकास आघाडीतील ठाकरे गट, काँग्रेस व अन्य घटक पक्षांनी आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली नाही. निवडून आल्यानंतर आरक्षण देऊ, असेही कुणी म्‍हणताना दिसत नाही. जरांगे यांनी सांगितल्यानंतर तसा व्हिडीओ अद्यापतरी कोणत्‍या उमेदवाराने दिलेला नाही. दुसरीकडे भाजप नेते मात्र आरक्षणाबद्दल सरकारने काय पावले उचलली, मराठा समाजासाठी सरकारने काय काय निर्णय घेतले, किती मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले याचे आकडे स्‍पष्टपणे सांगताना दिसतात. त्‍यातुलनेत महाविकास आघाडीच्या कोणत्‍याही पक्षाकडून साधी भूमिकाही स्‍पष्ट करण्यात येत नसल्याने समाजातील एक प्रवाह मविआच्या विरोधात ठाकला आहे.

नाराज निष्ठावंतांचा राजीनामा…
गंगापूरमधून शरद पवार गटाकडून तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ निवडणूक लढण्याचा इच्‍छुक होते. त्‍यांनी आता पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे यांच्याकडे दिला आहे. शरद पवार यांच्या सभेला डॉ. नीळ उपस्थित नव्हते. त्यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्‍हटले आहे, की निष्ठावंतांना न्याय मिळत नसल्याने आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत आहोत. डॉ. नीळ यांच्यासोबतच पक्षाचे सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत थोरात, युवकचे तालुकाध्यक्ष किशोर गवांदे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष संदीप तोगे, योगेश दिवटे, कांचन साबळे, वैजीनाथ पाटेकर, अश्फाक शेख, जुनेद पटेल यांनीही पदाचे राजीनामे दिले आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software