व्यापाऱ्याला एक कॉल पडला अडीच लाखांना!, दुचाकीला लटकवलेली पैशांची पिशवी घेऊन चोरट्याने ठोकली धूम !! , सिल्लोडची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : कॉल आल्याने व्यापारी मोबाइलवर बोलण्यात व्यस्त असल्याचे पाहून चोरट्याने दुचाकीला लटकवलेली अडीच लाखांची रोकड असलेली बॅग घेऊन पळ काढला. ही खळबळजनक घटना गुरुवारी (५ डिसेंबर) दुपारी एकच्या सुमारास सिल्लोड शहरातील सराफा मार्केटमधील कॅनरा बँकेसमोर घडली. व्यापारी अजय गाढेकर (रा. वरुडपिंप्री, ता. सिल्लोड) कॅनरा बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. बँकेतून २ लाख […]

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : कॉल आल्याने व्यापारी मोबाइलवर बोलण्यात व्यस्त असल्याचे पाहून चोरट्याने दुचाकीला लटकवलेली अडीच लाखांची रोकड असलेली बॅग घेऊन पळ काढला. ही खळबळजनक घटना गुरुवारी (५ डिसेंबर) दुपारी एकच्या सुमारास सिल्लोड शहरातील सराफा मार्केटमधील कॅनरा बँकेसमोर घडली.

व्यापारी अजय गाढेकर (रा. वरुडपिंप्री, ता. सिल्लोड) कॅनरा बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. बँकेतून २ लाख ५९ हजार रुपये काढून ९ हजार खिशात तर २ लाख ५० हजार रुपये बॅगेत ठेवून ते बँकेबाहेर आले. पैशांची बॅग दुचाकीला लटकवली. याचवेळी त्यांना कॉल आला. मोबाइलवर बोलण्यात ते व्यस्त असल्याचे हेरून चोरट्याने त्यांची नजर चुकवून पैशांची बॅग घेऊन धूम ठोकली.

कॉलवर बोलणे झाल्यावर गाढेकर यांनी दुचाकीकडे पाहिले तर बॅग नव्हती. त्‍यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन खातरजमा केली. गाढेकर यांच्या तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती लागले असून, त्‍यात चोरटा कैद झाला आहे. पोलीस आता त्‍याला शोधत आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software