व्यापाऱ्याची दिशाभूल करत ४ लाखांची बॅग घेऊन २ चोरटे पसार!, फुलंब्रीची खळबळजनक घटना, चोरटे CCTV त झाले कैद

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : व्यापाऱ्याची ४ लाख २० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग दोन चोरट्यांनी लंपास केली. ही घटना फुलंब्री शहरात गुरुवारी (७ नोव्‍हेंबर) सायंकाळी साडेपाचला घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. त्‍यांच्याविरुद्ध फुलंब्री पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस चोरट्यांचा युद्धपातळीवर शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने यांनी पत्रकारांना सांगितले. व्यापारी सचिन […]

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : व्यापाऱ्याची ४ लाख २० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग दोन चोरट्यांनी लंपास केली. ही घटना फुलंब्री शहरात गुरुवारी (७ नोव्‍हेंबर) सायंकाळी साडेपाचला घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. त्‍यांच्याविरुद्ध फुलंब्री पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस चोरट्यांचा युद्धपातळीवर शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने यांनी पत्रकारांना सांगितले.

व्यापारी सचिन काथार यांचे फुलंब्री शहरातील एसबीआय बँकेशेजारी भुसार मालाचे दुकान आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी काथार यांच्या दुकानासमोर चिल्लर पैसे टाकले. नंतर काथार यांच्याकडे आले व सांगितले, की दुकानासमोर तुमचे चिल्लर पैसे पडले आहेत. काथार हे चिल्लर पैसे आणण्यासाठी दुकानातून बाहेर आले असता चोरट्यांनी संधी साधून दुकानातील ४ लाख २० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन धूम ठोकली. ही बाब काथार यांच्या लक्षात आल्यानंतर त्‍यांनी फुलंब्री पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software