वैजापूरजवळ भीषण अपघातात 24 जखमी, चौघांची प्रकृती चिंताजनक, खासगी बसची कंटेनरला मागून धडक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा ) : समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यातील खंबाळा गावाजवळ खासगी बसने कंटेनरला मागून धडक दिली. यात ट्रॅव्हल्समधील 24 प्रवासी जखमी झाले. ही घटना आज (9 ऑक्टोबर) सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडला. वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू करण्यात आले. चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी आणले आहे. खासगी […]

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा ) : समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यातील खंबाळा गावाजवळ खासगी बसने कंटेनरला मागून धडक दिली. यात ट्रॅव्हल्समधील 24 प्रवासी जखमी झाले. ही घटना आज (9 ऑक्टोबर) सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडला. वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू करण्यात आले. चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी आणले आहे.

खासगी बस हैदराबाहून शिर्डीला जात होती. खंबाळा शिवारात बस येताच शिर्डीच्या दिशेने जाणार्‍या कंटेनरला बसने मागून जोरात धडक दिली. यात बसचालकासह 24 प्रवासी जखमी झाले. वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी हलवले. बसचालकाला पहाटे डुलकी लागत होती. प्रवाशांनी त्याला अलर्टही केले होते. मात्र तरीही त्याने बस थांबवली नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software