विहिरीत पडलेल्या वहिणीला वाचवताना दिराचा मृत्‍यू; पैठण तालुक्‍यातील दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पाणी शेंदताना तोल जाऊन वहिणी विहिरीत पडली. तिला वाचविण्यासाठी तरुणाने विहिरीत उडी घेतली. पण डोक्याला दगड लागून त्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पैठण तालुक्यातील बिडकीनजवळील लाखेगाव येथे गुरुवारी (२८ नोव्‍हेंबर) दुपारी अडीचच्‍या सुमारास घडली. करण छगन कच्छे (वय २७, रा. लाखेगाव) असे मृत्‍यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. करण दिल्ली […]

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पाणी शेंदताना तोल जाऊन वहिणी विहिरीत पडली. तिला वाचविण्यासाठी तरुणाने विहिरीत उडी घेतली. पण डोक्याला दगड लागून त्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पैठण तालुक्यातील बिडकीनजवळील लाखेगाव येथे गुरुवारी (२८ नोव्‍हेंबर) दुपारी अडीचच्‍या सुमारास घडली. करण छगन कच्छे (वय २७, रा. लाखेगाव) असे मृत्‍यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

करण दिल्ली येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी गावी सुटीवर आला होता. त्याची वहिणी संगीता राहुल कच्छे (वय ३२) गावाजवळील सरकारी विहिरीवर पाणी आणण्यास गेली होती. पाणी शेंदताना तोल गेल्याने ती विहिरीत पडली. हे कळताच करण तातडीने विहिरीकडे धावला. त्याने विहिरीत उडी मारली. मात्र करणच्या डोक्याला विहिरीतील दगड लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्‍याला बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. आस्मा शेख यांनी त्‍याला तपासून मृत घोषित केले. बिडकीन पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.

पतीने वाचवले…
राहुल आणि करण हे दोघे भाऊ आहेत. संगीता विहिरीत पडल्यानंतर करणने उडी घेतली, मात्र डोक्‍याला दगड लागून तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर राहुलने विहिरीत उडी घेतली. पत्नी संगीता व भाऊ करण यांना ग्रामस्थांच्या मदतीने त्‍यानेच विहिरीबाहेर काढले. संगीता बचावली. मात्र करणचा मृत्यू झाला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software