विभक्‍त पती-पत्‍नीच्या ‘राजकीय’ संघर्षात उदयसिंह राजपूत यांचे काय होणार?; कन्‍नडचा संघर्ष रोमांचक वळणावर!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर(सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजने दिलेली बातमी तंतोतंत खरी ठरत भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि त्‍यांना शिंदे गटाकडून कन्‍नडची उमेदवारीही मिळाली आहे. त्‍यांना आता ठाकरे गटाचे उमेदवार उदयसिंह राजपूत यांचा सामना करावा लागणार आहे. शिवाय विभक्‍त पती हर्षवर्धन जाधव यांच्याशीही त्‍यांची राजकीय लढत […]

छत्रपती संभाजीनगर(सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजने दिलेली बातमी तंतोतंत खरी ठरत भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि त्‍यांना शिंदे गटाकडून कन्‍नडची उमेदवारीही मिळाली आहे. त्‍यांना आता ठाकरे गटाचे उमेदवार उदयसिंह राजपूत यांचा सामना करावा लागणार आहे. शिवाय विभक्‍त पती हर्षवर्धन जाधव यांच्याशीही त्‍यांची राजकीय लढत होणार आहे. त्‍यांच्या उमेदवारीला शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. मात्र विरोधाला फारसे महत्त्व न देता संजना जाधव यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकण्यात आली.

शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख तथा बाजार समिती सभापती डॉ. मनोज राठोड, तालुकाप्रमुख केतन काजे हे संजना जाधव यांना उमेदवारी दिल्याने नाराज झाले. एवढेच नव्हे तर मित्र पक्ष असलेल्या अजित पवार गटाचे स्थानिक नेते संतोष कोल्हे यांनीही विरोध केला होता. शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा स्वाती कोल्हे यांनी उमेदवारी अर्जही दाखल केल्याने नाराजी केवळ दिसण्यापुरती न राहता प्रत्‍यक्ष लढाईतही सोसावी लागणार असल्याचे चित्र आहे. कन्‍नड मतदारसंघात आजवर जाधव घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. दिवंगत रायभान जाधव हे काँग्रेस पक्षाकडून आणि अपक्ष असे ३ वेळा आमदार राहिले. २००९ आणि २०१४ मध्ये मनसे आणि शिवसेनेकडून हर्षवर्धन जाधव आमदार होते. संजना जाधव जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्‍या. पती हर्षवर्धन जाधव यांच्यापासून विभक्‍त झाल्यानंतर त्‍यांनी विधानसभा निवडणुकीत एंट्री घेतल्याने विभक्‍त पती-पत्नीचा हा संघर्ष कोणत्‍या वळणावर जातो आणि त्‍यात उदयसिंह राजपूत यांचे काय होते, हे पाहणे रोमांचक ठरणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software