वर्षभरापूर्वी पक्षात आलेल्या घायाळांना उपनेतेपद, ठाकरेंच्या निर्णयाने निष्ठावंत ‘घायाळ’!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : वर्षभरापूर्वीच आ. अंबादास दानवे यांच्या नेतृत्त्वात ठाकरे गटात दाखल झालेले सचिन घायाळ यांना उद्धव ठाकरे यांनी थेट उपनेते केले. त्‍यांच्यावर जालना आणि पैठणची जबाबदारी सोपवली. अवघा पक्ष फुटल्यानंतर, संदिपान भुमरे हे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते घेऊन शिंदे गटात दाखल झालेले असताना त्‍या संकटात निष्ठावंतांनी ठाकरेंचा झेंडा खाली पडू दिला नाही. ते निष्ठेच्या […]

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : वर्षभरापूर्वीच आ. अंबादास दानवे यांच्या नेतृत्त्वात ठाकरे गटात दाखल झालेले सचिन घायाळ यांना उद्धव ठाकरे यांनी थेट उपनेते केले. त्‍यांच्यावर जालना आणि पैठणची जबाबदारी सोपवली. अवघा पक्ष फुटल्यानंतर, संदिपान भुमरे हे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते घेऊन शिंदे गटात दाखल झालेले असताना त्‍या संकटात निष्ठावंतांनी ठाकरेंचा झेंडा खाली पडू दिला नाही. ते निष्ठेच्या फळाच्या अपेक्षेत असताना त्‍यांच्यापैकी कुणालाही संधी न देता घायाळ यांना थेट उपनेते केल्याने निष्ठावंत उपरेच ठरल्याची भावना पैठणमध्ये व्यक्‍त होत आहे.

विधानसभा निवडणुकीत ज्‍या पद्धतीने भाजपमधून आलेल्यांना तिकिटांचे वाटप झाले, त्‍याच पद्धतीने मानाच्या पदांचे वाटपही सध्या सुरू असल्याने निष्ठावंतांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. साखर कारखानदारी, खतनिर्मिती आदी क्षेत्रात घायाळ कार्यरत आहेत. श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे ते सर्वेसर्वा आहेत. त्‍यांना ठाकरे गटात आणण्यासाठी प्रामुख्याने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रयत्‍न केले. मात्र नंतर त्‍यांची आ. दानवे यांच्याशी जवळीक वाढली. अवघ्या चाळीशीत असलेले घायाळ आता ठाकरे गटाचे उपनेते झाले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत पैठणमधून त्‍यांना विलास भुमरे यांच्याविरोधात निवडणूक लढायची होती. मात्र पक्षाने दत्ता गोर्डे यांना उमेदवारी दिली.

उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले होते. त्‍यावेळी स्वतः दानवे यांनी त्‍यांच्या घरी भेट दिली होती. त्‍यानंतरही त्‍यांनी ठाकरे गटाचा उमेदवार जिंकून यावा, यासाठी किती प्रयत्‍न केले, याबद्दल अजूनही निष्ठावंत कार्यकर्त्यांना शंका आहे. पैठणमधील पराभव जिव्हारी लागल्याने उद्धव ठाकरे यांनी घायाळांना उपनेते केल्याचे सांगण्यात येते. अशावेळी बंडखोरविरुद्ध निष्ठावंत असा सामना रंगवायला हरकत नव्हती. पण जी चूक विधानसभा निवडणुकीत ठाकरेंनी केली, तीच पद देतानाही केल्याची चर्चा होत आहे. संदिपान भुमरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना वाढवणाऱ्या प्रकाश वानोळे, सुरेश शेळके, अजय परळकर, लालू चिखले, राजू चौके, एम. जी. हाडे, राजू कुलकर्णी, मनोज पेरे, शुभम पिवळ या निष्ठावंतांना असे कोणते मोठे पद देण्याचे ठाकरेंच्या मनात का आले नसावे, असाही प्रश्न निर्माण होत आहे. दरम्‍यान, घायाळ यांनी नव्या जबाबदारीबद्दल म्हटले आहे, की उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या जबाबदारीचे सोने करण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करणार असून, विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. ठाकरे गट वाढीसाठी अहोरात्र झटणार असल्याचे ते म्हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software