लाचखोर ग्रामसेवक अर्जुन खरबडेला १० हजार घेताना पकडले!; वैजापूर तालुक्‍यात खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : गायगोठ्याचे बांधकाम केल्यानंतर त्या कामाच्या मोजमाप पुस्तिकेवर सही करण्यासाठी ग्रामसेवकाने ३५ हजार रुपये मागितले. तडजोडीनंतर १० हजार रुपये लाच घेण्यास तयार झाला. मात्र शेतकऱ्याने त्‍याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे (एसीबी) केली होती. एसीबीच्या पथकाने सापळा रचून लाचखोर ग्रामसेवक अर्जुन गंगाधर खरबडे (वय ४४) याला १० हजार रुपये घेताना रंगेहात पकडले. […]

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : गायगोठ्याचे बांधकाम केल्यानंतर त्या कामाच्या मोजमाप पुस्तिकेवर सही करण्यासाठी ग्रामसेवकाने ३५ हजार रुपये मागितले. तडजोडीनंतर १० हजार रुपये लाच घेण्यास तयार झाला. मात्र शेतकऱ्याने त्‍याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे (एसीबी) केली होती. एसीबीच्या पथकाने सापळा रचून लाचखोर ग्रामसेवक अर्जुन गंगाधर खरबडे (वय ४४) याला १० हजार रुपये घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई राहेगाव ग्रामपंचायत कार्यालय परिसरात शुक्रवारी (२८ जून) सायंकाळी पाचच्या सुमारास करण्यात आली आहे.

गावातील ७ शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेतून गायगोठ्याचे बांधकाम केले होते. त्याच्या अनुदानासाठी कामाच्या मोजमाप पुस्तिकेवर ग्रामसेवक खरबडेची सही आवश्यक होती. यासाठी त्‍याने ३५ हजार रुपयांची मागणी शेतकऱ्याकडे केली. तडजोडीअंती १० हजार रुपये रक्कम घेण्याचे ठरले. मात्र, शेतकऱ्याला लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.

या ठिकाणी तक्रार नोंदवल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचेच्या मागणीची खातरजमा करून ग्रामपंचायत कार्यालय परिसरात सापळा रचला. शुक्रवारी सायंकाळी पाचला शेतकऱ्याकडून १० हजार रुपये घेताना एसीबी पथकाने खरबडेच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई एसीबीचे अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार साईनाथ तोडकर, राजेंद्र जोशी, श्री. दैठणकर यांच्या पथकाने केली. खरडबेविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software