लई भारी… यापुढे वृद्ध आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या दिवट्यांना कोणतेही प्रमाणपत्र देणार नाही गंगापूर तालुक्‍यातील ही ग्रामपंचायत!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ज्‍यांनी लहानाचे मोठे केले, शिकवले, कामधंद्याला लावले… नंतर तेच अडचणीचे ठरू लागतात… वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या दिवट्यांना यापुढे कोणतेही प्रमाणपत्र न देण्याचा एेतिहासिक निर्णय गंगापूर तालुक्यातील दिघी काळेगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे. या निर्णयाची सध्या जिल्हाभर चर्चा होत आहे. अनेक दिवटे पूत्र वृद्ध आई- वडिलांना घरातून बाहेर काढतात. असे वृद्ध […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ज्‍यांनी लहानाचे मोठे केले, शिकवले, कामधंद्याला लावले… नंतर तेच अडचणीचे ठरू लागतात… वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या दिवट्यांना यापुढे कोणतेही प्रमाणपत्र न देण्याचा एेतिहासिक निर्णय गंगापूर तालुक्यातील दिघी काळेगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे. या निर्णयाची सध्या जिल्हाभर चर्चा होत आहे.

अनेक दिवटे पूत्र वृद्ध आई- वडिलांना घरातून बाहेर काढतात. असे वृद्ध बसस्थानक, सार्वजनिक ठिकाणी भिक्षा मागून जगतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी दिघी काळेगाव ग्रामपंचायत सरसावली आहे. सरपंच योगेश शेषराव साध्दे आणि सदस्यांनी अभिनव पाऊल उचलत गुरुवारी (२० जून) ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव पारित केला. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गावांमध्ये वयोवृद्ध आई- वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या व्यक्तींना कोणतेही सहकार्य करायचे नाही. त्यांना ग्रामपंचायतीमार्फत कोणतेही प्रमाणपत्र द्यायचे नाही. या ठरावाबद्दल या ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांचे कौतुक होत आहे. सभेला उपसरपंच मंगल आण्णासाहेब शिंदे, सदस्य लक्ष्मण साध्दे, इंदूबाई पवार, आशाबी शाहबुद्दीन शहा, संतोष डोखळे, लक्ष्मण गायकवाड, मनिषा गायकवाड, भास्कर शिंदे, संगीता नितनवरे, आण्णासाहेब भाऊसाहेब शिंदे, गणेश म्हसरूप, ग्रामविकास अधिकारी कारभारी काळवणे आदींची उपस्थिती होती. (बातमीतील छायाचित्र प्रतिकात्‍मक आहे.)

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software