रात्री जेवण करून झोपलेला पवन सकाळी उठलाच नाही… रात्रीतून नक्की झाले काय, कुणालाच कळेना…, गंगापूरची धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्‍यातील वाहेगाव येथे २१ वर्षीय पवन बाबासाहेब मनाळ शनिवारी (३१ ऑगस्ट) रात्री जेवण करून झोपी गेला…रविवारी (१ सप्‍टेंबर) सकाळी तो उठलाच नाही… सकाळी सहाला तो मृतावस्थेत असल्याचे समोर आले. त्‍याचा मृत्‍यू नेमका कशाने झाला हे कोडे बनले असून, उत्तरीय तपासणी अहवालातूनच नेमके कारण समोर येणार आहेत. अधिक तपास गंगापूर पोलीस […]

गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्‍यातील वाहेगाव येथे २१ वर्षीय पवन बाबासाहेब मनाळ शनिवारी (३१ ऑगस्ट) रात्री जेवण करून झोपी गेला…रविवारी (१ सप्‍टेंबर) सकाळी तो उठलाच नाही… सकाळी सहाला तो मृतावस्थेत असल्याचे समोर आले. त्‍याचा मृत्‍यू नेमका कशाने झाला हे कोडे बनले असून, उत्तरीय तपासणी अहवालातूनच नेमके कारण समोर येणार आहेत. अधिक तपास गंगापूर पोलीस करत आहेत.

मनाळ कुटुंब भूमिहीन, गरीब असून, वाहेगावला मोलमजुरी करतात. कुटुंबातील पवन हा होतकरू मुलगा शनिवारी रात्री जेवण केल्यानंतर नेहमीप्रमाणे घरात झोपी गेला होता. सकाळी ६ ला आईने आवाज देऊनही उठला नाही. आईने आरडाओरड सुरू केली तेव्हा धावून आलेल्या कुटुंबीयांनी त्याला तात्काळ गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, आजी असा परिवार आहे. पवनच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. तूर्त गंगापूर पोलिसांनी अाकस्मित मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार मनोज घोडके करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software