मोटारसायकल घेण्यासाठी ५० हजार हवे होते, पत्‍नी माहेरावरून आणत नव्हती, तिला मारहाण करून घर सोडण्यास बाध्य केले!; सिल्लोड तालुक्‍यातील धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : मोटारसायकल घेण्यासाठी ५० हजार रुपये माहेरावरून घेऊन ये, या मागणीसाठी विवाहितेचा छळ मांडला. पैसे आणत नसल्याने तिचा इतका छळ केला की तिला घर सोडण्यास बाध्य केले. ती २१ फेब्रुवारी २०२३ पासून माहेरी राहते. सासरच्यांनी नांदवण्यास नकार दिल्याने तिने अजिंठा पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला […]

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : मोटारसायकल घेण्यासाठी ५० हजार रुपये माहेरावरून घेऊन ये, या मागणीसाठी विवाहितेचा छळ मांडला. पैसे आणत नसल्याने तिचा इतका छळ केला की तिला घर सोडण्यास बाध्य केले. ती २१ फेब्रुवारी २०२३ पासून माहेरी राहते. सासरच्यांनी नांदवण्यास नकार दिल्याने तिने अजिंठा पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरती गजानन मोरे (वय २०, रा. दहेगाव ता. सिल्लोड ह. मु. हट्टी ता. सिल्लोड) या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. गजानन जगन मोरे (नवरा), लीलाबाई जगन मोरे (सासू), जगन गोडाजी मोरे (सासरा), राजू जगन मोरे (सर्व रा. दहेगाव ता. सिल्लोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तक्रारीत आरतीने म्हटले आहे, की ती एक वर्षापासून माहेरी हट्टी येथे आई-वडिलांकडे राहते. तिचे लग्न २० मार्च २०२२ रोजी दहेगाव येथील गजानन मोरेसोबत झाले. लग्न झाल्यावर पती चार दिवसांनी धरणगाव (जि. जळगाव) येथे कृषी सहायक असल्याने नोकरीसाठी निघून गेले.

अधूनमधून सुट्टी असल्यावर घरी येत होते. लग्न झाल्यावर दोन महिने सासरच्या लोकांनी तिला चांगले वागविले. नंतर सासू लीलाबाई लहान सहान कारणावरून शिवीगाळ करायला लागली. सासरे जगन मोरे दारू पिऊन येत शिवीगाळ करत. दीर राजू हा तू फारकती घेऊन घर सोडून निघून जा, असे म्हणून शिवीगाळ करत असे. असे एक वर्ष चालल्यानंतर आरती पतीला म्हणाली, की मला तुमच्यासोबत यायचे आहे. मला घरी सासू, सासरे त्रास देतात.

नंतर पती तिला धरणगाव येथे घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर पतीने कोणालाच फोन करायचा नाही, असे सांगितले. तोही छाेट्या मोठ्या कारणावरून शिवीगाळ करुन टोमणे मारून तुला घरातील काम येत नाही. मला मोटरसायकल घेण्यासाठी तुझ्या माहेरवरून पन्नास हजार रुपये घेऊन ये, असे म्हणून शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागला. त्यांनी त्रास देणे सुरूच ठेवल्याने आरती माहेरी निघून गेली, असे तक्रारीत म्‍हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार नीलेश शिरस्कर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software