महावितरणचा ‘महा’लाचखोर कार्यकारी अभियंता धनाजी रामुगडे, उपव्यवस्थापक प्रवीण दिवेकर रंगेहात अटक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वीज महावितरण कंपनीचा कन्‍नडचा कार्यकारी अभियंता धनाजी रघुनाथ रामुगडे व उपव्यवस्थापक प्रवीण कचरू दिवेकर (रा. पडेगाव) या दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना बुधवारी (१० जुलै) लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. रोहित्राच्या चार कामांचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडून १ लाख रुपयांची लाच त्‍यांनी घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रामुगडेच्या दालनातच सापळा रचून […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वीज महावितरण कंपनीचा कन्‍नडचा कार्यकारी अभियंता धनाजी रघुनाथ रामुगडे व उपव्यवस्थापक प्रवीण कचरू दिवेकर (रा. पडेगाव) या दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना बुधवारी (१० जुलै) लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.

रोहित्राच्या चार कामांचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडून १ लाख रुपयांची लाच त्‍यांनी घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रामुगडेच्या दालनातच सापळा रचून दोघांच्या मुसक्या आवळून पोलीस ठाण्यात वरात काढली. यापूर्वी दोघांनी ठेकेदाराकडून दीड लाख रुपये घेतले होते. मात्र, तरीही या लावखोरांची हाव संपली नव्हती…

दोघांनी ठेकेदाराकडे साडेतीन लाख रुपयांची मागणी केली होती. दीड लाख मिळाल्यानंतर दोन कामांचे प्रस्ताव त्‍यांनी मंजुरीसाठी पाठवले. उर्वरित दोन कामांसाठी पुन्हा दोन लाखांची मागणी केली. ठेकेदाराने दोघांना धडा शिकवण्याचा निर्णय घेत मंगळवारी थेट एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. त्‍यानंतर एसीबीने लाचेच्या मागणी आणि यापूर्वी लाच घेतल्याची खात्री केली व सापळा रचला.

मंगळवारी उशिरा तडजोडीअंती रामुगडे १ लाखावर तयार झाला. ठेकेदाराला त्याने दालनातच पैसे घेऊन यायला सांगितले. बुधवारी दुपारी पोलीस निरीक्षक अमोल धस यांच्या पथकाने सापळा रचून दालनात घुसून दोघांच्या मुसक्या आवळल्या. रामुगडेला दीड तर दिवेकरला १ लाख रुपये पगार आहे, हे विशेष. दोघांना अटक केल्यानंतर लगेचच दिवेकरच्या पडेगावच्या घराची झडती घेण्यात आली. दिवेकरच्या घरी ठाणे येथील एसीबी पथकाने छापा टाकला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software