भीषण आगीत अवघे गॅरेज खाक, सोयगाव तालुक्‍यातील आज पहाटेची घटना, ६ लाखांचे नुकसान

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : गोंदेगाव (ता. सोयगाव) येथील बनोटी चौफुलीवर असलेल्या स्वामी समर्थ ऑटो गॅरेजला आज, २२ डिसेंबरला पहाटे दोनच्या सुमारास अचानक भीषण आग लागून अवघे दुकान खाक झाले. घटनास्थळी पाचोरा येथील अग्निशमन दलाला पाचारण केल्यामुळे आग आटोक्यात आली. त्यामुळे शेजारची दुकाने आगीपासून वाचली. मंगलसिंग त्रंबक पवार यांचे श्री स्वामी समर्थ ऑटो गॅरेज आहे. शनिवारी […]

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : गोंदेगाव (ता. सोयगाव) येथील बनोटी चौफुलीवर असलेल्या स्वामी समर्थ ऑटो गॅरेजला आज, २२ डिसेंबरला पहाटे दोनच्या सुमारास अचानक भीषण आग लागून अवघे दुकान खाक झाले. घटनास्थळी पाचोरा येथील अग्निशमन दलाला पाचारण केल्यामुळे आग आटोक्यात आली. त्यामुळे शेजारची दुकाने आगीपासून वाचली.

मंगलसिंग त्रंबक पवार यांचे श्री स्वामी समर्थ ऑटो गॅरेज आहे. शनिवारी सायंकाळी ते नियमितपणे दुकान बंद करून घरी गेले. आज पहाटे दोनच्या सुमारास दुकानात आग लागल्याचा त्यांना कॉल आल्याने ते तातडीने दुकानाकडे धावले. आगीने रौद्ररुप धारण केल्याने काही मिनिटांतच सर्व काही जळून खाक झाले. दुकानातील एका मोटारसायकलीसह दुचाकींचे स्पेअर पार्ट, बॅटऱ्या, फर्निचर जळून गेले. यात त्यांचे सुमारे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

मंगलसिंग पवार यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात अर्ज दिला असून महसूलकडून अद्याप घटनेचा पंचनामा करण्यात आलेला नव्हता. आगीचे लोळ उंचच उंच दिसून येत होते. आग नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी कोणत्याही सुविधा नव्हत्या. त्यामुळे पाचोरा (जि. जळगाव) येथील अग्निशमन दलाच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पहाटे तीनला आग आटोक्यात आणली गेली. गॅरेजशेजारीच एका शेडमध्ये एका शेतकऱ्याचा ७५ क्विंटल कापूस होता. आग नियंत्रणात आल्यामुळे या शेतकऱ्याचे सुदैवाने नुकसान टळले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software