भरधाव ट्रॅक्‍टरने दुचाकीस्वाराला चिरडले!; जागीच मृत्‍यू, मागे बसलेला मुलगा गंभीर जखमी, कन्‍नडची दुर्घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव ट्रॅक्टरने दोघांना दुचाकीस्वारांना मागून उडवले. यात एकाचा मृत्‍यू तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना सोलापूर- धुळे महामार्गावरील कन्‍नडजवळील शाकंभरी जिनिंगजवळ रविवारी (१४ जुलै) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. राहुल ज्ञानेश्वर सोनवणे (वय २८, रा. मुंडवाडी, ता. कन्‍नड) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. राहुल सोनवणे हे त्यांचा चुलत मेहुणा कुंदन सतीश […]

कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव ट्रॅक्टरने दोघांना दुचाकीस्वारांना मागून उडवले. यात एकाचा मृत्‍यू तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना सोलापूर- धुळे महामार्गावरील कन्‍नडजवळील शाकंभरी जिनिंगजवळ रविवारी (१४ जुलै) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. राहुल ज्ञानेश्वर सोनवणे (वय २८, रा. मुंडवाडी, ता. कन्‍नड) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे.

राहुल सोनवणे हे त्यांचा चुलत मेहुणा कुंदन सतीश तलवाडे (वय १४, रा. भांबरवाडी ता. कन्‍नड) याच्यासह मोटारसायकलीने (क्र. एमएच २० एफए ७१०३) गंगापूर तालुक्यातील अंबेलोहोळला नातेवाइकांना भेटण्यासाठी येत जात होते. मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यात राहुल सोनवणे यांचा जागीच मृत्‍यू झाला, तर कुंदन तलवाडे गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरसह चालक पळून गेला. नागरिकांनी दोघांना कन्‍नड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध गायकवाड यांनी तपासून राहुल सोनवणे याला मृत घोषित केले, तर कुंदनवर उपचार केले जात आहेत. राहुल यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software