भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार २ विद्यार्थ्यांना चिरडले, एकाचा जागीच मृत्‍यू, दुसरा गंभीर, कन्‍नड शहराजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : दुचाकीस्वार २ विद्यार्थ्यांना टेम्पोने समोरून जोरदार धडक दिली. यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्‍यू तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना कन्‍नड- चाळीसगाव रस्त्यावरील जुन्या मधूर दूध डेअरीजवळ शनिवारी (७ सप्‍टेंबर) सकाळी साडेआठला घडली. जयदीप अनिल राठोड (वय १६) असे मृत्‍यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून, महेंद्र नामदेव चव्हाण (वय १९, दोघे […]

कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : दुचाकीस्वार २ विद्यार्थ्यांना टेम्पोने समोरून जोरदार धडक दिली. यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्‍यू तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना कन्‍नड- चाळीसगाव रस्त्यावरील जुन्या मधूर दूध डेअरीजवळ शनिवारी (७ सप्‍टेंबर) सकाळी साडेआठला घडली.

जयदीप अनिल राठोड (वय १६) असे मृत्‍यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून, महेंद्र नामदेव चव्हाण (वय १९, दोघे रा. सातकुंड, ता. कन्‍नड) असे जखमीचे नाव आहे. जयदीप ११ वीत शिकत होता. महेंद्रसोबत तो दुचाकीने (क्र. एमएच २० जीयू ९५७३) कन्‍नड शहरात कोचिंग क्‍लाससाठी येत होता. दोघांच्या दुचाकीला टेम्पोने (क्र. एमएच १२ एफडी ६७१६) उडवले. दोघेही गंभीर जखमी झाले.

ग्रामस्थांनी टेम्पोला पाठलाग करून सातकुंड येथे पकडले. मात्र चालक पळून गेला. ग्रामस्थ व पोलिसांनी जखमींना कन्‍नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी जयदीपला तपासून मृत घोषित केले. महेंद्रवर प्रथमोपचार करून चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी कन्‍नड शहर पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software