बिबट्याच्या हल्ल्यात १५ वर्षीय मुलाचा मृत्‍यू, सत्संगासाठी आश्रमात आला होता, लघुशंकेसाठी बाहेर पडला अन्‌…, कन्‍नडची थरारक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्‍नड (कार्तिक राजगुरू : सीएससीएन वृत्तसेवा) : कन्‍नड तालुक्‍यातील भांबरवाडीजवळील आनंद महाराज यांच्या आश्रम परिसरात बिबट्याच्या १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही खळबळजनक घटना मंगळवारी (२५ जून) रात्री घडली. ऋषिकेश विलास राठोड (रा. भांबरवाडी) असे मृत्‍यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ऋषिकेश आई- वडिलांसोबत गावाजवळील आनंद महाराजांच्या आश्रमात सत्संगासाठी आला होता. रात्री आठला तो लघुशंकेसाठी […]

कन्‍नड (कार्तिक राजगुरू : सीएससीएन वृत्तसेवा) : कन्‍नड तालुक्‍यातील भांबरवाडीजवळील आनंद महाराज यांच्या आश्रम परिसरात बिबट्याच्या १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही खळबळजनक घटना मंगळवारी (२५ जून) रात्री घडली. ऋषिकेश विलास राठोड (रा. भांबरवाडी) असे मृत्‍यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

ऋषिकेश आई- वडिलांसोबत गावाजवळील आनंद महाराजांच्या आश्रमात सत्संगासाठी आला होता. रात्री आठला तो लघुशंकेसाठी आश्रमाबाहेर गेल्यानंतर बराच वेळ झाला तरी परतला नसल्याने आई-वडिलांनी शोध सुरू केला. रात्रभर ग्रामस्थांनीही शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आश्रमापासून पाचशे मीटर अंतरावरील शंभर फूट खोल दरीत रक्ताने माखलेल्या अवस्थेत तो मिळून आला. त्याच्या अंगावर बिबट्याच्या नखांचे ओरखडे होते. त्याला नातेवाइकांनी कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास कुलकर्णी यांनी तपासून मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच कन्‍नड ग्रामीण ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ऋषिकेशच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. ऋषिकेश कन्‍नड येथील साने गुरुजी विद्यालयात नववीत शिकत होता. तो अत्यंत हुशार विद्यार्थी होता. शिक्षणासाठी गावातून कन्‍नडला येजा करत होता. घरात धार्मिक वातावरण असल्याने लहानपणापासून आई- वडिलांसोबत सत्संगासाठी आश्रमात जात होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software