फुलंब्रीत सोमनाथने, पैठणमध्ये एकनाथने गळफास घेऊन केली आत्‍महत्‍या!; दोघेही तिशीचे, गुरुवारी सकाळीच टोकाचा निर्णय

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : फुलंब्रीजवळील शेतवस्तीवर राहणाऱ्या ३० वर्षीय युवकाने गावातील देवदेवतांचे दर्शन घेऊन घरी येत लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना गुरुवारी (२९ ऑगस्ट) सकाळी नऊच्या सुमारास घडली. सोमनाथ मंजाराम चोपडे असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. फुलंब्री शहरात रोज पहाटे पाचला दिंडी काढली जाते. सोमनाथने दिंडीत सहभाग घेतला होता. […]

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : फुलंब्रीजवळील शेतवस्तीवर राहणाऱ्या ३० वर्षीय युवकाने गावातील देवदेवतांचे दर्शन घेऊन घरी येत लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना गुरुवारी (२९ ऑगस्ट) सकाळी नऊच्या सुमारास घडली. सोमनाथ मंजाराम चोपडे असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.

फुलंब्री शहरात रोज पहाटे पाचला दिंडी काढली जाते. सोमनाथने दिंडीत सहभाग घेतला होता. दर्शन घेतले, आरती केली होती. त्याचा भाऊ अमोल गावातून शेतवस्तीवर आल्यावर सकाळी ९ ला सोमनाथने आत्‍महत्‍या केल्याचे समोर आले. अमोलने आरडाओरड सुरू केल्याने वस्तीवरील लोक धावून आले. नातेवाइकांनी सोमनाथला फुलंब्रीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमनाथच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. फुलंब्री पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद केली आहे.

पैठणमध्ये युवकाची आत्‍महत्‍या
पैठण शहरातील नवीन कावसानमध्ये गुरुवारी (२९ ऑगस्ट) सकाळी ३० वर्षीय एकनाथ ज्ञानेश्वर बांगर याने राहत्‍या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्‍याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software