पाय घसरून विहिरीत पडल्याने १७ वर्षीय मुलाचा मृत्‍यू, कन्‍नड तालुक्‍यातील दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने रवींद्र भास्कर सुसर (वय १७) याचा मृत्‍यू झाला. ही घटना कन्‍नड तालुक्‍यातील आमदाबाद येथे रविवारी (१ सप्‍टेंबर) सायंकाळी घडली. रवींद्र अकरावीत शिकत होता. कुटुंबीयांना शेतकामात मदत करण्यासाठी शेतात आला होता. सायंकाळी विहिरीच्या काठावर उभा असताना अचानक पाय घसरून तो पडला अन्‌ बुडाला. ही बाब लक्षात येताच […]

कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने रवींद्र भास्कर सुसर (वय १७) याचा मृत्‍यू झाला. ही घटना कन्‍नड तालुक्‍यातील आमदाबाद येथे रविवारी (१ सप्‍टेंबर) सायंकाळी घडली. रवींद्र अकरावीत शिकत होता. कुटुंबीयांना शेतकामात मदत करण्यासाठी शेतात आला होता.

सायंकाळी विहिरीच्या काठावर उभा असताना अचानक पाय घसरून तो पडला अन्‌ बुडाला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी आरडाओरड सुरू केली. आसपासच्या शेतकऱ्यांनी धाव घेऊन विहिरीत रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. मात्र रवींद्र मिळाला नाही. सोमवारी सकाळी प्रयत्‍न करूनही रवींद्र सापडत नसल्याने अखेर छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमन दलाला बोलाविण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सायंकाळी चारला त्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. पिशोर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. सायंकाळी रवींद्रवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, एक बहीण, असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software