पाचोडजवळ भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्‍यू; मृतांत लिंबगाव सोसायटीच्या चेअरमनचा समावेश

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : मोटारसायकलीला उडवून भरधाव वाहन पसार झाले. यात मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्‍यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, २९ सप्‍टेंबरला सायंकाळी साडेसातच्या सुमारास पाचोड- पैठण रोडवर पाचोडपासून जवळच असलेल्या भुमरे पाटील पेट्रोलपंपासमोर घडली. छगन एकनाथराव भांगळ(वय ५८, रा. थेरगाव, ता. पैठण) व गोरख भाऊराव हिंगले पाटील(वय ६०, रा. लिंबगाव, ता. पैठण) अशी मृत्‍यू झालेल्यांची […]

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : मोटारसायकलीला उडवून भरधाव वाहन पसार झाले. यात मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्‍यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, २९ सप्‍टेंबरला सायंकाळी साडेसातच्या सुमारास पाचोड- पैठण रोडवर पाचोडपासून जवळच असलेल्या भुमरे पाटील पेट्रोलपंपासमोर घडली.

छगन एकनाथराव भांगळ(वय ५८, रा. थेरगाव, ता. पैठण) व गोरख भाऊराव हिंगले पाटील(वय ६०, रा. लिंबगाव, ता. पैठण) अशी मृत्‍यू झालेल्यांची नावे आहेत. छगन भांगळ रविवारच्या आठवडे बाजारासाठी पाचोडला आले होते. ते परत गावाकडे निघाले असता पाचोड बसस्थानकासमोर लिंबगावच्या सेवा संस्थेचे चेअरमन गोरख हिंगले त्यांना भेटले. हिंगले यांच्या मोटरसायकलमधील पेट्रोल संपल्याने भांगळ यांच्या मोटरसायकलवर बसून पेट्रोलपंपाकडे पेट्रोल आणण्यासाठी जात असताना पैठणकडून पाचोडकडे येणाऱ्या वाहनाने त्यांना उडवले.

यात दोघांच्याही डोक्‍याला गंभीर मार लागून ते जागीच गतप्राण झाले. वाहन न थांबता निघून गेल्याने वाहनाबद्दल माहिती समोर आली नाही. पाचोड पोलीस या वाहनांचा तपास करत आहेत. ग्रामस्थांच्या मदतीने सहायक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे पाटील, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब गव्हाणे यांनी मृतदेह पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. रात्री नऊला अपघाताची नोंद पाचोड पोलिसांनी घेतली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software