मॅरिड बाईसोबत अफेअर तरुणाला चांगलेच महागात पडले!; आधी तिच्यासोबत नको त्‍या अवस्थेत पाहून तिच्या पतीने झोडपले, आता तिनेही बलात्‍काराचा गुन्हा दाखल केला!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवणे तरुणाला चांगलेच महागात पडले. तिच्यासोबत नको त्‍या अवस्थेत पाहिल्यानंतर तिच्या पतीने बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी होऊन १० दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याला मारहाण करून गंभीर जखमी केल्याने त्याच्या वडिलांनी फुलंब्री पोलिसांत तक्रार केली होती. त्‍यावरून पोलिसांनी महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा […]

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवणे तरुणाला चांगलेच महागात पडले. तिच्यासोबत नको त्‍या अवस्थेत पाहिल्यानंतर तिच्या पतीने बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी होऊन १० दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याला मारहाण करून गंभीर जखमी केल्याने त्याच्या वडिलांनी फुलंब्री पोलिसांत तक्रार केली होती. त्‍यावरून पोलिसांनी महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता विवाहित प्रेयसीही तरुणावर उलटली आहे. तिनेही फुलंब्री पोलिसांत आपल्यावर बलात्‍कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली आहे. त्‍यावरून पोलिसांनी सोमवारी (९ सप्‍टेंबर) रात्री आठला तरुणाविरुद्ध बलात्‍कार, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या बिंग फुटलेल्या अनोख्या लव्हस्टोरीची चर्चा पूर्ण तालुक्‍यात चवीने होत आहे.

एका प्रसिद्ध दैनिकात आलेल्या वृत्तानुसार, अनिल सदाशिव कापरे (वय २४, रा. महालकिन्होळा, ता. फुलंब्री) याचे खामखेड्यातील एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे अनिल ३० ऑगस्टला दुपारी एकच्या सुमारास तिला भेटण्यासाठी खामखेड्याला गेला होता. दोघे एकांतवासात असतानाच तिचा पती घरी धडकला. दोघांना नको त्या अवस्थेत पाहून त्याचा संताप इतका अनावर झाला, की अनिलला मारहाण करायला सुरुवात केली. त्याच्या मारहाणीत अनिल गंभीर जखमी झाला. त्याला छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. तेव्हापासून त्‍याच्यावर उपचार सुरू आहेत. त्‍याचे वडील सदाशिव कापरे यांनी शनिवारी (७ सप्‍टेंबर) या प्रकरणात फुलंब्री पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्‍यामुळे सोमवारी अनिलच्या विवाहित प्रेयसीनेही फुलंब्री पोलीस ठाणे गाठून अनिलने बलात्‍कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार केली. त्‍यामुळे पोलिसांनी अनिलविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. एका विवाहित बाईसोबत अनैतिक संबंध ठेवणे अनिलला चांगलेच गोत्‍यात आणणारे ठरले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software