पतीसमोरच २५ वर्षीय तरुणीची साडी सोडण्याचा प्रयत्‍न, हात धरून जवळ ओढले, विहामांडव्यातील घटनेने खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पाचोड, ता. पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीसमोरच २५ वर्षीय विवाहितेची साडी सोडण्याचा प्रयत्‍न करून तिचा हात धरून जवळ ओढत अश्लील कृत्‍य करणाऱ्या तरुणाविरुद्ध पाचोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विहामांडवा (ता. पैठण) येथे मंगळवारी (६ ऑगस्ट) सकाळी ही घटना घडली. ज्ञानेश्वर आसाराम गाभूड (रा. विहामांडवा, ता. पैठण) असे संशयित तरुणाचे नाव आहे. त्‍याच्याविरुद्ध विहामांडवा येथील […]

पाचोड, ता. पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीसमोरच २५ वर्षीय विवाहितेची साडी सोडण्याचा प्रयत्‍न करून तिचा हात धरून जवळ ओढत अश्लील कृत्‍य करणाऱ्या तरुणाविरुद्ध पाचोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विहामांडवा (ता. पैठण) येथे मंगळवारी (६ ऑगस्ट) सकाळी ही घटना घडली.

ज्ञानेश्वर आसाराम गाभूड (रा. विहामांडवा, ता. पैठण) असे संशयित तरुणाचे नाव आहे. त्‍याच्याविरुद्ध विहामांडवा येथील विवाहितेने तक्रार दिली आहे. मंगळवारी सकाळी पती-पत्‍नी त्यांच्या विहामांडवा गावाजवळील प्लॉटकडे कारने आले होते. रस्त्यात ज्ञानेश्वर गाभूड याने दगड ठेवला होता. तो विवाहितेच्या पतीने बाजूला केला असता शिवीगाळ करतच ज्ञानेश्वर गाभूड त्‍यांच्याकडे आला.

विवाहितेने त्‍याला समजावून सांगण्याचा प्रयत्‍न केला असता त्‍याने कारची तोडफोड करत विवाहितेचा उजवा हात धरून तिला जवळ ओढले. तिच्या साडीचा पदर धरून साडी सोडण्याचा प्रयत्‍न केला. परत या ठिकाणी कार लावली तर जाळून टाकेन. तुम्‍हाला नवरा- बायकोला जीवे मारेन, अशी धमकी दिली. पोलिसांनी ज्ञानेश्वरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software