नापिकी, कर्जबाजारीपणामुळे सोयगावच्या शेतकऱ्याने घेतला गळफास

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे निंबायती (ता. सोयगाव) येथील अकील मुसा तडवी (वय ३०) या शेतकऱ्याने जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी-मेनगाव रस्त्यावरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (१८ फेब्रुवारी) दुपारी दोनला समोर आली. तडवी यांच्या एकत्रित कुटुंबाची निंबायती शिवारात पाच एकर शेती आहे. तडवी यांच्याकडे राष्ट्रीयीकृत बँकेसह खासगी असे एकूण २ लाख […]

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे निंबायती (ता. सोयगाव) येथील अकील मुसा तडवी (वय ३०) या शेतकऱ्याने जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी-मेनगाव रस्त्यावरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (१८ फेब्रुवारी) दुपारी दोनला समोर आली.

तडवी यांच्या एकत्रित कुटुंबाची निंबायती शिवारात पाच एकर शेती आहे. तडवी यांच्याकडे राष्ट्रीयीकृत बँकेसह खासगी असे एकूण २ लाख ६० हजार थकीत कर्ज होते. खरीप आणि रब्‍बी हंगामातही निसर्गाच्या लहरीपणामुळे अपेक्षित उत्‍पन्‍न हाती न आल्याने कर्ज फेडण्याची त्‍यांना चिंता होती. यातून त्यांनी आत्‍महत्‍या केल्याचे कौटुंबिक सूत्रांनी सांगितले. तडवी यांना जामनेर तालुक्यातील पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले होते, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. याबाबत पहूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software