‘नक्शा’ प्रकल्प : कन्नड येथे ड्रोन सर्व्हेक्षणास प्रारंभ, मालमत्तेच्या अधिकृत दस्तऐवजामुळे भवितव्य सुकर : जिल्हाधिकारी स्वामी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : केंद्र शासनामार्फत शहरी भागातील जमिनीची ड्रोनद्वारे मोजणी करून अद्ययावत व अधिक अचूक नकाशे तयार करण्याचा ‘नक्शा’(National geospatial Knowledge based land Survey of urban Habitations: NAKSHA) उपक्रम आज, १८ फेब्रुवारीला कन्नड येथे सुरू झाला. प्रथदर्शी प्रकल्प म्हणून कन्नड नगरपालिकेची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा असलेल्या ड्रोन सर्व्हेक्षणाचा प्रारंभ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : केंद्र शासनामार्फत शहरी भागातील जमिनीची ड्रोनद्वारे मोजणी करून अद्ययावत व अधिक अचूक नकाशे तयार करण्याचा ‘नक्शा’(National geospatial Knowledge based land Survey of urban Habitations: NAKSHA) उपक्रम आज, १८ फेब्रुवारीला कन्नड येथे सुरू झाला. प्रथदर्शी प्रकल्प म्हणून कन्नड नगरपालिकेची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा असलेल्या ड्रोन सर्व्हेक्षणाचा प्रारंभ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला.

शहरी भागातील मालमत्तांचे ड्रोनच्या साह्याने मोजणी, दस्तऐवजीकरण होऊन मालमत्ता प्रमाणपत्र मिळेल. भूमी अभिलेख, महसूल,नगरपालिका यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘नक्शा’ प्रकल्पामुळे आपले भवितव्य सुकर आणि सुलभ होईल,असे प्रतिपादन यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. कन्नड उपविभागीय अधिकारी कार्यालयात ‘नक्शा’ प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते ड्रोन कार्यान्वित करून शुभारंभ झाला. कन्नड उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार विद्याचरण कडावकर, उपसंचालक भूमी अभिलेख किशोर जाधव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉ. विजय वीर, सर्व्हे ऑफ इंडियाचे सुरेंद्र सुतार, कन्नडचे गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, नगरपालिका मुख्याधिकारी, नागरिकांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, ‘नक्शा’ या प्रकल्पासाठी कन्नड शहराची निवड झाली आहे. ड्रोनद्वारे मालमत्ता मोजणी होऊन अचूक सिमांकन होईल. या मोजणीचे प्रमाणपत्र मालमत्ताधारकाला वितरित होणार आहे. हा एक वैध व भक्कम पुरावा असल्याने मालमत्ता, जागेची हद्द यावरून होणारे वाद संपुष्टात येतील. सर्वच मालमत्तांची मोजणी होणार असल्याने महसूल प्राप्त होईल. महसूल, नगरपालिका आणि भूमी अभिलेख कार्यालय यांच्या संयुक्त जबाबदारीतून हे कार्य पूर्ण होईल. पथदर्शी प्रकल्पात जिल्ह्याला ही मोठी संधी प्राप्त झाली आहे. राज्यातील दहा जिल्ह्यांपैकी संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये हा पथदर्शी नक्शा उपक्रम राबविण्यात येत असून यात राज्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून सर्व विभागाने समन्वयाने काम करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी ही आपल्या भाषणात या प्रकल्पाचे फायदे समजावून संगितले. प्रास्ताविक तहसीलदार विद्याचरण कडावकर यांनी केले. ग्रामीण भागातील जमिन मोजणी व मालमत्ता कार्ड तयार करून देण्यासंदर्भात नुकताच स्वामित्व प्रकल्प राबविण्यात आला. त्याच धर्तीवर शहरी भागातील जमिन मोजणी करून मालमत्ता कार्ड देण्याबाबत ‘नक्शा’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्यात १० नगरपालिका क्षेत्रामध्ये हा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येत आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड नगरपालिकेचा समावेश आहे. कन्नड नगरपालिकेचे ४.८० चौरस किलोमिटर क्षेत्रातील मालमत्तांचे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण केले जाईल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software