धुळे-सोलापूर महामार्गावर अवजड वाहतूक मार्गात ९ ते २० सप्‍टेंबरदरम्यान बदल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खुलताबाद शहरात जर-जरी-जर बक्ष उर्स व ईद ए मिलाद या सणानिमित्त होणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता ९ ते २० सप्‍टेंबरदरम्यान धुळे- सोलापूर महामार्गावरील अवजड वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत, असे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी निर्गमित केले आहेत. खुलताबाद शहरात ९ सप्‍टेंबरपासून २० सप्‍टेंबरपर्यंत जरजरी बक्ष उर्स […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खुलताबाद शहरात जर-जरी-जर बक्ष उर्स व ईद ए मिलाद या सणानिमित्त होणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता ९ ते २० सप्‍टेंबरदरम्यान धुळे- सोलापूर महामार्गावरील अवजड वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत, असे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी निर्गमित केले आहेत.

खुलताबाद शहरात ९ सप्‍टेंबरपासून २० सप्‍टेंबरपर्यंत जरजरी बक्ष उर्स तर १६ सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद हा सण साजरा होणार आहे. खुलताबाद शहरात यानिमित्त हजरत मोहम्मद पैगंबर यांचे पैरहन मुबारक दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे या कालावधीत धुळे- सोलापूर महामार्गावर अवजड वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. हे बदल ९ ते २० सप्‍टेंबरदरम्यान सायंकाळी ६ ते सकाळी ८ यावेळात लागू राहतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

वाहतुकीतील बदल याप्रमाणे…
-फुलंब्रीकडून कन्नड व धुळेकडे जाणारी सर्व जड वाहतूक ही छत्रपती संभाजीनगर- शरणापूर फाटा – माळीवाडा- वरझडी- कसाबखेडा- देवगाव रंगारी- शिऊर-तलवाडा घाटमार्गे चाळीसगाव, धुळेकडे जाईल.
-धुळे, कन्‍नडकडून येणारी सर्व जड वाहतूक ही तलवाडा घाट- शिऊर- देवगाव रंगारी- कसाबखेडा- वरझडी-माळीवाडा- छत्रपती संभाजीनगरमार्गे फुलंब्रीकडे जाईल.
-छत्रपती संभाजीनगर खुलताबादमार्गे चाळीसगाव -धुळेकडे जाणारी जड वाहतूक ही छत्रपती संभाजीनगर – माळीवाडा- कसाबखेडा फाटा- देवगाव रंगारी – शिऊर- तलवाडा घाटमार्गे चाळीसगावकडे जाईल.
-धुळे, चाळीसगावकडून खुलताबादमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी सर्व जड वाहतूक ही तलवाडा घाट शिऊर – देवगाव रंगारी- कसाबखेडा फाटा- वरझडी- माळीवाडामार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाईल.
-वेरुळ, खुलताबादकडून फुलंब्रीकडे जाणारी वाहतूक ही वेरुळ – कसाबखेडा फाटा- माळीवाडामार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाईल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software