धावत्या एसटी बसमध्ये महिलेला सुरू झाल्या प्रसुती कळा, पुढे काय झालं वाचा…, पैठणची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : धावत्या बसमध्ये एका गर्भवतीला अचानक प्रसुती कळा सुरू झाल्या. बसवाहक-चालकाने प्रसंगावधान राखून बस बाजूला उभी केली. तिथे महिला प्रवाशांच्या मदतीने नॉर्मल प्रसुती झाली. महिलेने मुलाला जन्म दिला. बाळ आणि बाळंतीण दोघेही ठणठणीत आहेत. ही घटना शनिवारी (२६ ऑक्‍टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पैठण तालुक्‍यातील लोहगाव फाट्याजवळ घडली. शिरनेर (ता. अंबड) येथील २५ […]

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : धावत्या बसमध्ये एका गर्भवतीला अचानक प्रसुती कळा सुरू झाल्या. बसवाहक-चालकाने प्रसंगावधान राखून बस बाजूला उभी केली. तिथे महिला प्रवाशांच्या मदतीने नॉर्मल प्रसुती झाली. महिलेने मुलाला जन्म दिला. बाळ आणि बाळंतीण दोघेही ठणठणीत आहेत. ही घटना शनिवारी (२६ ऑक्‍टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पैठण तालुक्‍यातील लोहगाव फाट्याजवळ घडली.

शिरनेर (ता. अंबड) येथील २५ वर्षीय विवाहिता शनिवारी दुपारी चितेगावला माहेरी बाळंतपणासाठी पैठण- छत्रपती संभाजीनगर बसने जात होती. बस ढोरकीनपुढे निघताच महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. बसचालक हरी दातीर व वाहक भास्कर झारगड यांनी तातडीने बस लोहगाव फाट्याच्या बाजूला उभी केली. महिला प्रवाशांनी तिला बसखाली उतरवून तिची नॉर्मल डिलिव्हरी करण्यात यश मिळविले. या महिलेने मुलाला जन्म दिला. तोपर्यंत बसचालकाने १०८ नंबरवर कॉल करून रुग्णवाहिका बोलावून घेतली. रुग्णवाहिकेतून महिलेसह बाळाला बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिची व बाळाची तपासणी करून दोघांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software