दोन वेगळ्या घटना : जिन्स-टॉप घातलेल्या युवतीचा मृतदेह आढळला सलीम अली सरोवरात, लॉजवर ४० वर्षीय महिलेसह थांबलेल्या युवकाचा हार्टॲटॅकने मृत्‍यू

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील सलीम अली सरोवरात राखाडी जिन्स, काळा टॉप घातलेल्या अंदाजे ३० ते ४० वयोगटातील युवतीचा मृतदेह गुरुवारी (२२ ऑगस्ट) सायंकाळी आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच सिटीचौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. २ ते ३ दिवसांपूर्वी तिने तलावात उडी घेऊन आत्‍महत्या केल्याचा अंदाज […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील सलीम अली सरोवरात राखाडी जिन्स, काळा टॉप घातलेल्या अंदाजे ३० ते ४० वयोगटातील युवतीचा मृतदेह गुरुवारी (२२ ऑगस्ट) सायंकाळी आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली.

माहिती मिळताच सिटीचौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. २ ते ३ दिवसांपूर्वी तिने तलावात उडी घेऊन आत्‍महत्या केल्याचा अंदाज आहे.तिच्या खिशात काही चिल्लर पैसे मिळाले. मात्र, कुठलेही ओळखपत्र मिळाले नसल्याने ओळख पटू शकली नाही. पोलीस ओळख पटविण्यासाठी प्रयत्‍न करत असून, कुणी ओळखत असल्यास सिटी चौक पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महिलेसोबत थांबलेल्या युवकाला हार्टॲटॅक…
पैठण तालुक्यातील ढोरकीनजवळील टाकळी धनगाव परिसरातील ओम साईलीला लॉजवर एका ४० वर्षीय महिलेसोबत थांबलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या ३४ वर्षीय युवकाचा हार्टॲटॅकने मृत्‍यू झाल्याची घटना गुरुवारी (२२ ऑगस्ट) पहाटे समोर आली. रूमच्या बाथरूममध्ये तो कोसळला. शेख सद्दाम शेख इमाम (वय ३४ वर्षे, रा. रोशनगेट, छत्रपती संभाजीनगर) असे त्‍याचे नाव आहे. अंमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यातील आरोपी महिलेचा शेख सद्दामने जामीन घेतला. त्‍यामुळे न्यायालयाने तिची जामिनावर सुटका केली. नंतर ही महिला आणि शेख सद्दाम आनंद साजरा करायला कारने लॉजवर गेले अन्‌ हा प्रकार घडला. तीन वर्षांपासून महिला आणि शेख सद्दाम एकमेकांना ओळखतात.

२१ ऑगस्टला जामिनावर महिलेची सुटका होताच तो कारने ओम साईलीला लॉजवर घेऊन आला. रात्री १० वाजता ते आले. रूम बुक करून रूममध्ये गेल्यानंतर कंटकी मागवली. त्यानंतर त्‍याने दारू पिली. पहाटे साडेतीनला बाथरूमला गेला अन्‌ तिथेच कोसळला. हा प्रकार महिलेच्या लक्षात आल्यावर तिने तत्‍काळ लॉज मॅनेजरला कळवले. लॉज मॅनेजरने डायल ११२ ला कॉल करत पोलिसांना माहिती दिली. त्‍याला घाटी रुग्णालयात आणले असता डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यानुसार पैठण एमआयडीची पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार दिनेश दाभाडे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघूही शकणार नाही...

Latest News

छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघूही शकणार नाही... छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघूही शकणार नाही...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहरात अनोळखी मृतदेह मिळून येण्याचे प्रमाण लक्षणीय ठरत आहे. १ ऑक्‍टोबरपासून...
सामाजिक कार्यकर्तीच्या फेसबुक पोस्टवर अश्लील शिवीगाळीचा भडीमार, पोलिसांनी २३ जणांविरुद्ध केला गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरातील प्रकार
लई हुशारी केली, पण शेवटी घडा भरलाच!; ‘कायद्या’चा गैरवापर करून लाखो रुपये उकळले, अखेर दुकलीला आता पडल्या बेड्या!!, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सायबर पोलिसांची कामगिरी, नक्की काय आहे स्टोरी वाचूया... 
मंजूरपुऱ्यातील ‘बॉस पब्लीक चॉईस’ रेडिमेड कपड्यांचे दुकान फोडले, चोरट्यांनी शर्ट-पँट नेले...
गोमटेश मार्केटमध्ये भल्ला चाट भंडारसमोर तरुणांमध्ये हाणामारी!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software