दोन चोरट्यांना सचिनने शिकवला धडा!; शस्‍त्राचे वार होऊनही गंभीर जखमी अवस्थेत प्रखर प्रतिकार, अखेर चोरट्यांनीच ठोकली धूम!!; कन्‍नडची आहे अंगावर शहारे आणणारी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : घरात शिरलेल्या दोनपैकी चोरट्याला घरमालकाने पकडले. त्यामुळे चोरट्यांसोबत त्यांची झटापट झाली. एका चोरट्याने धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर दोन्ही चोरट्यांनी धूम ठोकल्याची खळबळजनक घटना कन्‍नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे शनिवारी (५ ऑक्‍टोबर) पहाटे चारला घडली. सचिन फुलसिंग बरथरे (वय ३२) हे चोरट्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. […]

कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : घरात शिरलेल्या दोनपैकी चोरट्याला घरमालकाने पकडले. त्यामुळे चोरट्यांसोबत त्यांची झटापट झाली. एका चोरट्याने धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर दोन्ही चोरट्यांनी धूम ठोकल्याची खळबळजनक घटना कन्‍नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे शनिवारी (५ ऑक्‍टोबर) पहाटे चारला घडली.

सचिन फुलसिंग बरथरे (वय ३२) हे चोरट्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. सचिन बरथरे जेवण केल्यानंतर कुटुंबासह झोपले होते. शनिवारी पहाटे चारला दोन चोरट्यांनी मागील दरवाजातून घरात प्रवेश केला. दरवाजा वाजल्याने सचिन यांना जाग आली. त्यांना दोन चोरटे घरात आल्याचे दिसले. सचिन यांनी एका चोराला पकडले असता दुसरा चोरटा त्याला सोडविण्यासाठी सरसावला. दोन चोरटे अन्‌ सचिन यांच्यात झटापट सुरू झाली. एका चोरट्याने धारदार शस्त्राने सचिन यांचा खांदा, डावा हात आणि छातीवर वार केल्याने सचिन गंभीर जखमी झाले. मात्र त्‍याही परिस्थितीत त्‍यांनी चोरट्यांचा प्रतिकार केल्याने अखेर चोरटे पळून गेले. पिशोर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचानामा केला आहे. या घटनेमुळे कन्‍नड तालुक्‍यात खळबळ उडाली असून, रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software