देवी मूर्तीच्या विसर्जनादरम्‍यान पिता-पुत्र नदीपात्रात बुडाले!; सिल्लोडची हृदयद्रावक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्ल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : देवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना पिता, पूत्र वांजोळा (ता. सिल्लोड) येथील पूर्णा नदीपात्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (१२ ऑक्‍टोबर) दुपारी दोनला घडली. रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात दोघांचा शोध घेण्यात आला, मात्र मृतदेह मिळून आले नव्हते. सांडू नामदेव सागरे (वय ४५) व निवृत्ती सांडू सागरे (वय १७, दोघे रा. केऱ्हाळा, बेलेश्वरवाडी, ता. सिल्लोड, ह. […]

सिल्ल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : देवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना पिता, पूत्र वांजोळा (ता. सिल्लोड) येथील पूर्णा नदीपात्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (१२ ऑक्‍टोबर) दुपारी दोनला घडली. रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात दोघांचा शोध घेण्यात आला, मात्र मृतदेह मिळून आले नव्हते. सांडू नामदेव सागरे (वय ४५) व निवृत्ती सांडू सागरे (वय १७, दोघे रा. केऱ्हाळा, बेलेश्वरवाडी, ता. सिल्लोड, ह. मु. जयभवानीनगर, सिल्लोड) अशी बुडालेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत.

पूर्णा नदीपात्रात सांडू सागरे, त्यांचा मोठा मुलगा निवृत्ती, छोटा मुलगा तीर्थराज हे तिघे देवीच्या विसर्जनासाठी आले होते. विसर्जन करताना निवृत्तीचा पाय घसरून तो नदीपात्रात पडला. त्याला वाचविण्यासाठी सांडू सागरे यांनी नदीपात्रात उडी घेतली. नदीपात्र खोल असल्याने पिता-पूत्र दोघेही बुडाले. तीर्थराज धावत गावात येऊन गावकऱ्यांना सांगितल्यांतर गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र बराच शोध घेऊनही त्‍यांना सांडू सागरे व निवृत्तीचा शोध लागला नाही.

अखेर छत्रपती संभाजीनगर येथील महापालिकेच्या रेस्क्यू टीम व अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनीही रात्रीनंतर उशिरापर्यंत शोध घेतला. मात्र शोध लागला नाही. सांडू सागरे हे सिल्लोड तालुक्यातील गव्हाली येथे महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयात शिक्षक असून निवृत्ती सिल्लोडच्या कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिकत होता. पूर्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्‍याच खड्ड्यात सागरे पिता-पूत्र बुडाले. त्‍यामुळे ग्रामस्थांनी रोष व्यक्‍त केला असून, अवैध वाळू उपसा आता तरी प्रशासनाने थांबविण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software