दूध दरवाढीसाठी छत्रपती संभाजीनगरचे शेतकरी आक्रमक; अंगावर दूध ओतून सरकारचे वेधले लक्ष

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दूध दरवाढीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. आडगाव बुद्रूक (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे शनिवारी (२९ जून) संतप्त शेतकऱ्यांनी अंगावर दूध ओतून आंदोलन केले. भीषण दुष्काळात विकत पाणी घेऊन पशुधनाला सांभाळाले आहे. उत्पादन खर्च ३५ रुपयांवर गेला आहे. त्या तुलनेत भाव उणे १० रुपये म्हणजे २५ रुपये प्रतिलिटर मिळत […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दूध दरवाढीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. आडगाव बुद्रूक (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे शनिवारी (२९ जून) संतप्त शेतकऱ्यांनी अंगावर दूध ओतून आंदोलन केले. भीषण दुष्काळात विकत पाणी घेऊन पशुधनाला सांभाळाले आहे. उत्पादन खर्च ३५ रुपयांवर गेला आहे. त्या तुलनेत भाव उणे १० रुपये म्हणजे २५ रुपये प्रतिलिटर मिळत असल्याने दूध विक्री व्यवसाय संकटात सापडल्याचे दूध उत्‍पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दुधाला प्रतिलिटर ४० रुपये भाव द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

अर्थसंकल्पात दुधाला प्रतिलिटर ४० रुपये भाव सरकार देईल ही अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. आंदोलक विश्वंबर हाके म्हणाले, की विकतचा चारा- पाणी घेऊन पशुधनाला मुलाप्रमाणे सांभाळत आहोत. सरकारने गांभीर्याने घेऊन तातडीने दुधाला ४० रुपये हमी भाव जाहीर करणे गरजेचे होते. अधिवेशन काळात निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही आंदोलक शेतकरी जगदीश डवले, गणेश हाके, कचरू दसपुते, बाबासाहेब हुसे यांनी दिला. आंदोलनात मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. सरकारने निवडणुकीच्या तोंडावर दुधाला ५ रुपये अनुदान जाहीर केले होते. जाचक नियम व अटी असल्याने १ हजार पैकी १० दूध उत्पादकांना या अनुदानाचा लाभ घेतल्याचेही हाके म्हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software