- Marathi News
- जिल्हा न्यूज
- दुर्दैवी… छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३ तरुणांसह एका महिलेला जलसमाधानी!
दुर्दैवी… छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३ तरुणांसह एका महिलेला जलसमाधानी!
सिल्लोड/ खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन तरुणांसह एका महिलेला दुर्दैवी जलसमाधी मिळाली, तर एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतली. या घटना रविवारी (१३ ऑक्टोबर) सिल्लोड, खुलताबाद आणि वैजापूर तालुक्यात समोर आल्या आहेत. -निल्लोड (ता. सिल्लोड) येथील निवृत्ती लक्ष्मण आहेर (वय २१) हा छत्रपती संभाजीनगर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. शनिवारी दसऱ्यानिमित्त […]
सिल्लोड/ खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन तरुणांसह एका महिलेला दुर्दैवी जलसमाधी मिळाली, तर एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतली. या घटना रविवारी (१३ ऑक्टोबर) सिल्लोड, खुलताबाद आणि वैजापूर तालुक्यात समोर आल्या आहेत.
-मराठा आरक्षणासाठी महेश रखमाजी इंगळे (वय २५) याने विहिरीत उडी घेऊन जलसमाधी घेतली. ही घटना वैजापूरनजीक इंगळे वस्ती येथे रविवारी दुपारी चारला समाेर आली. महेश शनिवारी रात्रीपासून बेपत्ता होता. स्वतःच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळला. वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी सहाच्या सुमारास महेशच्या पार्थिवावर इंगळे वस्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येपूर्वी महेशने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. महेश अविवाहित होता. नोकरी मिळत नसल्याने एका व्यापाऱ्याकडे काम करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
