तहसीलदारांची खुर्ची जाळणाऱ्या सरपंच साबळेंना अटक, हर्सूल कारागृहात रवानगी, अखंड मराठा समाजानेही फटकारले, साबळे समाज अन्‌ आरक्षणविरोधी!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : फुलंब्री तहसील कार्यालयातील तहसीलदारांची खुर्ची कार्यालयाबाहेर आणून पेटवून देणाऱ्या गेवराई पायगाच्या सरपंच मंगेश साबळे यांच्यासह तिघांना फुलंब्री पोलिसांनी मंगळवारी (२४ सप्टेंबर) दुपारी साडेबाराला दरीफाटा येथून अटक केली. गुन्हा दाखल करून त्‍यांना न्यायालयात हजर केले असता तिघांचीही न्यायालयाने हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. मंगेश साबळे, अजिनाथ नारायण साबळे (रा. गेवराई पायगा), वसंत […]

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : फुलंब्री तहसील कार्यालयातील तहसीलदारांची खुर्ची कार्यालयाबाहेर आणून पेटवून देणाऱ्या गेवराई पायगाच्या सरपंच मंगेश साबळे यांच्यासह तिघांना फुलंब्री पोलिसांनी मंगळवारी (२४ सप्टेंबर) दुपारी साडेबाराला दरीफाटा येथून अटक केली. गुन्हा दाखल करून त्‍यांना न्यायालयात हजर केले असता तिघांचीही न्यायालयाने हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे.

मंगेश साबळे, अजिनाथ नारायण साबळे (रा. गेवराई पायगा), वसंत शामराव बनसोड (रा. पाथ्री) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिघे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास तहसील कार्यालयात आले. तहसीलदारांच्या दालनात कोणीही नसल्याची संधी साधून त्यांनी तहसीलदारांची खुर्ची इमारतीबाहेर आणली. सोबत आणलेल्या कॅनमधील पेट्रोल टाकून खुर्ची पेटवून दिली. नंतर त्यांनी एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. महसूल सहायक दिलीपसिंग पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून फुलंब्री पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंगेश साबळे यांनी आपल्या कृत्‍याचे समर्थन केले असून, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खुर्ची पेटवून दिल्याचे म्‍हटले आहे.

अखंड मराठा समाजाने मंगेश साबळेंचा केला निषेध…
दरम्यान, अखंड मराठा समाजाने सायंकाळी पोलिसांना पत्र देत मंगेश साबळे व वसंत बनसोड यांचा अखंड मराठा समाजाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसून, या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे म्हटले आहे. पत्रात म्हटले आहे, की अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे शांततेच्या मार्गाने बेमुदत उपोषण सुरू आहे. त्यांनी सर्व मराठा समाज सेवकांना शांततेत आंदोलन करण्याचा आदेश दिला आहे. जो कोणी जाळपोळ, शासकीय कार्यालयांची नासधूस करेल, तो आमच्या मराठा समाजाचा, आरक्षणाच्या विरोधी असेल असे स्पष्ट आदेश दिल्याचेही पत्रात म्‍हटले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software