जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कन्नड मतदार संघातील पूर्वतयारीचा आढावा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : कन्नड विधानसभा मतदारसंघाचा आज, १७ ऑक्‍टोबरला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आढावा घेतला. स्ट्राँगरूम पाहणी, निवडणूक विषयक कामकाजासंदर्भात प्रशासनाने केलेल्या सर्व पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार विद्याचरण कडवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, गटविकास अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी चंद्रहार ढोकणे, यतिन कोठावळे तसेच सर्व झोनल […]

कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : कन्नड विधानसभा मतदारसंघाचा आज, १७ ऑक्‍टोबरला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आढावा घेतला. स्ट्राँगरूम पाहणी, निवडणूक विषयक कामकाजासंदर्भात प्रशासनाने केलेल्या सर्व पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.

आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार विद्याचरण कडवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, गटविकास अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी चंद्रहार ढोकणे, यतिन कोठावळे तसेच सर्व झोनल अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी कन्नड तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख, नोडल अधिकारी व झोनल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व ग्राम विकास अधिकारी यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयास भेट दिली.

साहित्य वाटप, जमा करणे, स्‍ट्राँग रूम येथे भेट देऊन पाहणीही केली. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपण करीत असलेल्या कामाचे पूर्ण ज्ञान असले पाहिजे. निवडणूक आयोगाने सर्व बाबींचा विचार करून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सर्व सूचनांची माहिती आपण घेतली पाहिजे. मतदान केंद्र, त्याचा परिसर, मतदान यंत्रे, त्याची प्रक्रिया, तसेच मतदान केंद्रावर मतदारांना द्यावयाच्या सुविधांच्या पूर्ततेबाबत प्रत्येक केंद्राधिकाऱ्याने वेळोवेळी आढावा घ्यावा. त्यासाठी प्रत्येकाने अभ्यास करुन सज्ज असावे,असे निर्देश त्यांनी दिले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software