चोऱ्यांसाठी आता मुलांचा वापर…बँकेतून मुलांनी दीड लाखाची बॅग लांबवली!, वैजापूरची खळबळजनक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हसोबा चौक शाखेतून ग्राहकाची १ लाख ४० हजार रुपयांची बॅग दोन लहान मुलांनी लांबवल्याची घटना समोर आल्याने वैजापूरमध्ये खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी (११ जुलै) दुपारी चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलांचा शोध सुरू केला आहे. जीवनगंगा सोसायटीतील जीम ट्रेनर तथा बॅग […]

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हसोबा चौक शाखेतून ग्राहकाची १ लाख ४० हजार रुपयांची बॅग दोन लहान मुलांनी लांबवल्याची घटना समोर आल्याने वैजापूरमध्ये खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी (११ जुलै) दुपारी चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलांचा शोध सुरू केला आहे.

जीवनगंगा सोसायटीतील जीम ट्रेनर तथा बॅग मॅन्युफॅक्चरर विजय त्रिभुवन यांनी या प्रकरणात तक्रार दिली. यांनी गुरुवारी बंधन बँकेतून १ लाख ४० हजार रुपये काढले व त्यात आणखी २० हजार रुपये टाकून ही रक्कम भरण्यासाठी म्हसोबा चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आले. बचत खात्यात २० हजार रुपये जमा करत असतानाच लहान मुलाने त्यांची १ लाख ४० हजार रुपये रक्कम व आधार कार्ड, लायसन्स, मतदान कार्ड, बँकेचे पासबुक, चेकबुक व एटीएम कार्ड असलेली बॅग घेऊन पळ काढला. लहान मुलगा बँकेबाहेर उभ्या असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळून गेला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार श्री. झाल्टे करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software