- News
- जिल्हा न्यूज
- चुलत साडूचा तारेने गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह शेतात पुरला!; सिल्लोडची अंगावर शहारे आणणारी घटना
चुलत साडूचा तारेने गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह शेतात पुरला!; सिल्लोडची अंगावर शहारे आणणारी घटना
सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : ३५ वर्षीय चुलत साडूचे अपहरण करून आधी पैसे मागितले, त्याने नकार दिल्याने त्याचा खून करून मृतदेह शेतात पुरला. नंतर मृतकाच्या भाचाला मेसेज करून खंडणी मागितली. हा खळबळजनक प्रकार घाटनांद्रा (ता. सिल्लोड) येथे बुधवारी (२५ सप्टेंबर) समोर आला. कैलास नामदेव मोरे (वय ३५, रा. घाटनांद्रा) असे खून झालेल्याचे नाव असून, पोलिसांनी क्रूरकर्मा […]
सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : ३५ वर्षीय चुलत साडूचे अपहरण करून आधी पैसे मागितले, त्याने नकार दिल्याने त्याचा खून करून मृतदेह शेतात पुरला. नंतर मृतकाच्या भाचाला मेसेज करून खंडणी मागितली. हा खळबळजनक प्रकार घाटनांद्रा (ता. सिल्लोड) येथे बुधवारी (२५ सप्टेंबर) समोर आला.
खून का केला?
खुनाचे कारण समोर आले असून, संजयने पैशासाठी कैलासचा घात केला. त्याला कॉल करून बोलावून घेत गोड बोलून शेतात नेले. तिथे पैशाची मागणी केली. त्याने नकार देताच संजयने त्याचा ताराने गळा आवळून खून केला. मृतदेह मकामध्ये लपवून ठेवला. त्यानंतर तो घरी गेला. कैलासच्या कुटुंबीयांना त्याला शोधण्यासाठी मदत करण्याचे नाटक केले. रात्री पुन्हा शेतात जाऊन कैलासचा मृतदेह बांधावर खड्डा करून पुरला. काही झालेच नाही या अविर्भावात घरी येऊन झोपी गेला. दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांनी सिल्लोड पोलिसांत कैलास हरवल्याची तक्रार दिली. शेअर मार्केटमध्ये ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याने त्याने पैशांसाठी नात्याचीही पर्वा केली नाही.

