घोसला शिवारात ढगफुटी! ३० मिनिटांत होत्याचं नव्हतं!! खटकाळी नदीला महापूर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा ) : सोयगाव तालुक्‍यातील घोसला येथे आज, ९ सप्‍टेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक ३० मिनिटांच्या पावसाने दाणादाण उडवून दिली. ढगफुटीसदृश पावसाने होत्याच नव्हते केले. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यात वाचवून जगलेली पिके या ढगफुटीने नष्ट झाली. सोयगाव तालुक्यातील घोसला शिवारात अचानक सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला. खटकाळी नदीला महापूर आल्यामुळे सोयगाव- बनोटी रस्त्यावर […]

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा ) : सोयगाव तालुक्‍यातील घोसला येथे आज, ९ सप्‍टेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक ३० मिनिटांच्या पावसाने दाणादाण उडवून दिली. ढगफुटीसदृश पावसाने होत्याच नव्हते केले. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यात वाचवून जगलेली पिके या ढगफुटीने नष्ट झाली.

सोयगाव तालुक्यातील घोसला शिवारात अचानक सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला. खटकाळी नदीला महापूर आल्यामुळे सोयगाव- बनोटी रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली. पूराच्या पाण्याने सायंकाळी थैमान घातले होते. रात्री उशिरापर्यंत घोसला शिवारात आपत्तीग्रस्त स्थिती उद्‌भवली होती. मात्र प्रशासनाचे आपत्ती निवारण पथक मदतीला धावून आले नव्हते. त्यामुळे पूरग्रस्त स्थितीत ग्रामस्थ व शेतकरी जीव मुठीत घेऊन आहेत. सोयगाव तालुक्यात पावसाची भुरभुर हजेरी असताना घोसला शिवारावरच अचानक ढगफुटी झाली. या ढगफुटी पावसाची नोंद केवळ याच गावात झाली. सोयगाव तालुक्यातील कोणत्याही गावात पाऊस झाला नाही. त्यामुळे या ढगफुटी पावसाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software