- News
- जिल्हा न्यूज
- घरात घुसून झोपलेल्या २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार!; गंगापूरची धक्कादायक घटना
घरात घुसून झोपलेल्या २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार!; गंगापूरची धक्कादायक घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर/गंगापूर/फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : घरात झोपलेल्या २२ वर्षीय विवाहित तरुणीवर गावातीलच तरुणाने घरात घुसून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात समोर आली आहे. रोहित संजय दुशिंग असे संशयित तरुणाचे नाव आहे. गंगापूर पोलिसांनी मंगळवारी (दि.२५) सायंकाळी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गंगापूर तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय पीडित विवाहितेने रोहितविरुद्ध […]
छत्रपती संभाजीनगर/गंगापूर/फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : घरात झोपलेल्या २२ वर्षीय विवाहित तरुणीवर गावातीलच तरुणाने घरात घुसून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात समोर आली आहे.
दुसऱ्या घटनेत फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथे एका महिलेचा घरात घुसून गावातीलच युवकाने अश्लील चाळे केले. ही घटना बुधवारी (२६ जून) दुपारी घडली. याप्रकरणी फुलंब्री ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी एकला बाळू म्हस्के हा महिलेच्या घरात घुसला व त्याने अश्लील चाळे केले. महिलेने हा प्रकार तिच्या पतीला सांगितला. त्यानंतर सायंकाळी साडेसहाला पती-पत्नी फुलंब्री पोलीस ठाण्यात आले व बाळूविरुद्ध तक्रार दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.
महिलेचा पाठलाग, मोबाइलवर बोल म्हणून धमक्या…
मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात एका महिलेने तरुणाविरुद्ध पाठलाग व धमक्या दिल्याची तक्रार केली आहे. अक्षय वासनिक (रा. रामनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मोबाइलवर बोलण्यासाठी विवाहितेला मेसेज करत होत्या. तुझ्या पतीला जीवे मारेल, असे धमकावत होता. १ एप्रिलपासून तो पाठलाग करत होता. मोबाइल क्रमांक मिळवून तिला मेसेज, कॉल करून धमकावल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

