ग्रामपंचायत निवडणूक : जात वैधता प्रमाणपत्र १९ जुलैपर्यंत सादर करा, जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्ह्यात सन २०२०-२१, सन २०२२ व जून २०२३ या कालावधीत ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक, पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या सर्व संबंधित उमेदवारांना जात वैधता प्रमाण पत्र सादर करण्यासाठी दिलेली मुदत ९ जुलैला संपली असून, त्यांनी वैधता प्रमाणपत्र १९ जुलैपर्यंत सादर करावे, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कळविले आहे. जिल्ह्यात सन २०२०-२१ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्ह्यात सन २०२०-२१, सन २०२२ व जून २०२३ या कालावधीत ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक, पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या सर्व संबंधित उमेदवारांना जात वैधता प्रमाण पत्र सादर करण्यासाठी दिलेली मुदत ९ जुलैला संपली असून, त्यांनी वैधता प्रमाणपत्र १९ जुलैपर्यंत सादर करावे, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात सन २०२०-२१ सन २०२२ व जून २०२३ पर्यंत राज्य निवडणूक आयोगाचे प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमनिहाय पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक, पोट निवडणूकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांनी त्या त्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्याकडे शासन अध्यादेशानुसार दिलेल्या बारा महिन्यांच्या मुदत वाढीच्या कालावधीत जात वैधता समितीकडून प्राप्त झालेल्या जात वैधता प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत १९जुलै २०२४ रोजीपर्यंत न चुकता सादर करावी. संबंधितांनी जात वैधता प्रमाणपत्राची प्रत सादर न केल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १०-१ अ, कलम ३०-१ अ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी कळविले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software