गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना; फुलंब्री अन्‌ वैजापूर तालुक्यातून मागविले प्रस्ताव

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या सुधारित योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी केले आहे. शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे जिल्ह्यातील फुलंब्री व वैजापूर या दोन तालुक्यातील पात्र गोशाळांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. योजनेचा मूलभूत उद्देश काय?दुग्धोत्पादनास, शेती कामास, पशु पैदाशीस, ओझी वाहण्याच्या कामास उपयुक्त […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या सुधारित योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी केले आहे. शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे जिल्ह्यातील फुलंब्री व वैजापूर या दोन तालुक्यातील पात्र गोशाळांचे अर्ज मागविण्यात आले आहेत.

योजनेचा मूलभूत उद्देश काय?
दुग्धोत्पादनास, शेती कामास, पशु पैदाशीस, ओझी वाहण्याच्या कामास उपयुक्त असलेल्या, नसलेल्या गाय, वळू, बैल व वय झालेले गोवंश यांचा सांभाळ करणे. अशा पशुधनासाठी चारा, पाणी व निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देणे. गोवर्धन गोवंश केंद्रामधील पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणीसाठी वैरण उत्पादन कार्यक्रम राबविणे. गोमूत्र, शेण आदींपासून विविध उत्पादने, खत, गोबर गॅस व इतर उप-पदार्थाच्या निर्मितीस प्रोत्साहान, चालना देणे.

लाभार्थी गोशाळेच्या निवडीच्या अटी व शर्ती…
संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असावी. संस्थेचे नजीकच्या मागील ३ वर्षांचे लेखा परीक्षण झालेले असणे आवश्यक आहे. संस्थेस गोवंश संगोपनाचा कमीत कमी ३ वर्षांचा अनुभव असावा. केंद्रावर असलेल्या पशुधनास आवश्यक असलेली वैरण चारा उत्पादनासाठी तसेच पशुधनाच्या संगोपनासाठी स्वत:च्या मालकीची किंवा ३० वर्षांच्या नोंदणीकृत भाडेपट्ट्यावरची किमान ५ एकर जमीन असावी. संस्थेने मागणी केलेल्या एकूण अनुदानाच्या कमीत कमी १० टक्के एवढे खेळते भाग भांडवल संस्थेकडे असणे आवश्यक आहे.

लाभार्थी गोशाळेच्या निवडीची प्रक्रिया तसेच विहित नमुन्यातील अर्ज अनुषंगिक कागदपत्रे याबाबतची सविस्तर माहिती पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक पात्र गोशाळांनी विहित नमुन्यातील अर्ज आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाकडे २५ पर्यंत सादर करावेत. महाराष्ट्र गो सेवा आयोग कार्यालयाकडे थेट सादर केलेले तसेच ई-मेल किंवा तत्सम द्वारे सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, असेही जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.पी.डी.झोड यांनी कळविले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software