गॅरेजचालकाची बाबासाहेब काळे यांची आत्महत्या; खुलताबादच्या ताजनापूरची धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : खुलताबाद तालुक्यातील ताजनापूर येथे गॅरेजचालक बाबासाहेब विश्वनाथ काळे (वय ३८, रा. ताजनापूर) यांनी पत्र्याच्या शेडमधील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (१४ सप्‍टेंबर) दुपारी दोनच्या सुमारास समोर आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. बाबासाहेब काळे यांचे बाजारसावंगी येथे गॅरेज आहे. ताजनापूर ते शिरोडी रस्त्यावरील शेतात त्‍यांचे पत्र्याचे […]

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : खुलताबाद तालुक्यातील ताजनापूर येथे गॅरेजचालक बाबासाहेब विश्वनाथ काळे (वय ३८, रा. ताजनापूर) यांनी पत्र्याच्या शेडमधील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (१४ सप्‍टेंबर) दुपारी दोनच्या सुमारास समोर आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

बाबासाहेब काळे यांचे बाजारसावंगी येथे गॅरेज आहे. ताजनापूर ते शिरोडी रस्त्यावरील शेतात त्‍यांचे पत्र्याचे शेड असून, शेडमधील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते ग्रामस्थांना दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने बाजारसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. सायंकाळी उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक भाऊ, एक मुलगी असा परिवार आहे. याबाबत खुलताबाद पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software