गळ्याला पकडून ५० फूट फरपटत नेत शेतकऱ्याचे बिबट्याने तोडले लचके!; सोयगाव-बुलडाणा सीमेवरील घटनेने अंगावर शहारे!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : सोयगाव आणि बुलडाण्याच्या सीमेवर गिरडा घाटात गुरुवारी (२९ ऑगस्ट) दुपारी अडीचच्‍या सुमारास सुनील सुभाष जाधव (वय ३६, रा. गिरडा, ता. जि. बुलडाणा) या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. गळ्याला पकडून ४० ते ५० फूट ओढत दरीत नेत लचके तोडून ठार मारले. अजिंठा डोंगर रांगेतील गोंदणखेड शिवारात गिरडा घाटात जाधव यांची शेती आहे. […]

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : सोयगाव आणि बुलडाण्याच्या सीमेवर गिरडा घाटात गुरुवारी (२९ ऑगस्ट) दुपारी अडीचच्‍या सुमारास सुनील सुभाष जाधव (वय ३६, रा. गिरडा, ता. जि. बुलडाणा) या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. गळ्याला पकडून ४० ते ५० फूट ओढत दरीत नेत लचके तोडून ठार मारले.

अजिंठा डोंगर रांगेतील गोंदणखेड शिवारात गिरडा घाटात जाधव यांची शेती आहे. शेतातील खरीप पिकांची राखण करण्यासाठी ते शेतात गेले होते. दुपारी अडीचच्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच सोयगाव येथील वनविभागाचे अधिकारी, परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्याला बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software