बिडकीनमध्ये गणेश मंडळावर दगडफेक; ८ जणांविरुद्ध दंगलीचे गुन्हे दाखल, तिघांना अटक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

बिडकीन, ता. पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : बिडकीन येथील बाजार गल्लीतील महारुद्र गणेश मंडळावर मंगळवारी (१० सप्‍टेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास दगडफेक करणाऱ्या ८ जणांविरुद्ध बिडकीन पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तिघांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. रोहित रवींद्र मिसाळ (वय २०, रा. बाजार गल्ली, बिडकीन) याने तक्रारीत म्हटले आहे की, तो घरी जात असताना आफ्रिदी आयाज शेख याने […]

बिडकीन, ता. पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : बिडकीन येथील बाजार गल्लीतील महारुद्र गणेश मंडळावर मंगळवारी (१० सप्‍टेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास दगडफेक करणाऱ्या ८ जणांविरुद्ध बिडकीन पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तिघांना पोलिसांनी ताब्यातही घेतले.

रोहित रवींद्र मिसाळ (वय २०, रा. बाजार गल्ली, बिडकीन) याने तक्रारीत म्हटले आहे की, तो घरी जात असताना आफ्रिदी आयाज शेख याने त्याला दुचाकीचा कट मारला. त्यावरून बाचाबाची झाली. आफ्रिदी व त्याचा साथीदार इरशाद शेख याने रोहितच्या मानेवर लोखंडी हुक मारून गंभीर जखमी केले. आफ्रिदी अयाज शेख, वजीर बशीर शेख, शेख इम्रान शेख सत्तार, आयान शाहा, समीर शाहा, इरशाद शेख, बबलू शहा, अशपाक शेख या आठ जणांनी मिळून गल्लीतील इतर चार ते सात जणांना लोखंडी रॉड, लाकडी दांडा, दगड विटाने मारून जखमी केले. जखमींत सोमनाथ मिसाळ, रूपेश हिवाळे, पांडुरंग हिवाळे, सचिन तळेकर, रितेश हिवाळे यांचा समावेश आहे.

आफ्रिदीचीही तक्रार…
दरम्यान, आफ्रिदी आयाज शेख यानेही परस्परविरोधी तक्रार दिली असून, त्याला रोहित मिसाळ, पियूष हिवाळे, आक्या हिवाळे आणि इतर पाच ते सहा जणांनी लाथाबुक्क्यानी मारहाण करुन त्याच्या गाडीची तोडफोड केल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. त्यावरून रोहित ऊर्फ सोम्या मिसाळ, पियूष हिवाळे, आक्या हिवाळे यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नारायण गीते करीत आहेत.

काय आहे घटना
बाजार गल्लीतील महारुद्र गणेश मंडळासमोर कार्यकर्ते ढोल वाजविण्याचा सराव करत असताना अचानक जमावाने त्यांच्यावर तुफान दगडफेक केली. यात पाच कार्यकर्ते जखमी झाले. दगडफेकीत ढोलवाद्येही फुटली. एक दगड गणेशमूर्ती जवळ जाऊन पडला. पण सुदैवाने मूर्तीला नुकसान झाले नाही. या घटनेनंतर बिडकीनमध्ये तणाव निर्माण झाला होता. पोलीस अधीक्षकांनी पोलिसांच्या तुकड्या बिडकीनमध्ये पाठवल्या होत्या. सध्या सणोत्सवांचे दिवस असून शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन निरीक्षक प्रमोद पाटील यांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software