गंगापूर, खुलताबादमध्ये २ भीषण अपघात; टिप्‍पर अन्‌ ट्रॅक्‍टर २ दुचाकीस्वारांसाठी बनले काळ!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

भरधाव टिप्परच्या धडकेने गंगापूरजवळ दुचाकीस्वाराचा मृत्‍यू गंगापूर /खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव टिप्परने दुचाकीला मागून धडक दिली. यात दुचाकीस्वार कृष्णा साहेबराव तांदळे (वय ३८, रा. गाढे पिंपळगाव, ता. वैजापूर) यांचा मृत्यू झाला. ही घटना गंगापूर शहराजवळ वैजापूर मार्गावरील एका हॉटेलसमोर शुक्रवारी (२५ ऑक्‍टोबर) सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडली. कृष्णा दुचाकीने (क्र. एमएच २० एफटी ६८४१) गंगापूरला […]

भरधाव टिप्परच्या धडकेने गंगापूरजवळ दुचाकीस्वाराचा मृत्‍यू

गंगापूर /खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव टिप्परने दुचाकीला मागून धडक दिली. यात दुचाकीस्वार कृष्णा साहेबराव तांदळे (वय ३८, रा. गाढे पिंपळगाव, ता. वैजापूर) यांचा मृत्यू झाला. ही घटना गंगापूर शहराजवळ वैजापूर मार्गावरील एका हॉटेलसमोर शुक्रवारी (२५ ऑक्‍टोबर) सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडली.

कृष्णा दुचाकीने (क्र. एमएच २० एफटी ६८४१) गंगापूरला येत होते. शहराजवळ येताच नाशिकहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या टिप्परने (क्र. एमएच १५ एचएच ६०८०) त्‍यांच्या दुचाकीला मागून जोरात धडक दिली. यात कृष्णा गंभीर जखमी झाले. त्यांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सायंकाळी उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई-वडील, एक भाऊ, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

खुलताबाद : ट्रॅक्‍टरच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्‍यू
विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दाऊद रशीद शेख (वय २८, रा. टाकळी राजेराय, ता. खुलताबाद) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (२५ ऑक्‍टोबर) सायंकाळी सातच्या सुमारास काटशिवरीफाटा ते टाकळी राजेराय रोडवर (ता. खुलताबाद) घडला. दाऊद शेख मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ग्रामस्थांनी घटनास्थळी धावून शेख यांना खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. दाऊद आई- वडिलांना एकुलते एक होते. वर्षभरापूर्वीच त्‍यांचे लग्‍न झाले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software