खून केल्याने जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याची पैठणमध्ये आत्‍महत्‍या!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण येथील खुल्या कारागृहातील कैदी सुभाष रमेश केंगार (वय ३२, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) याने जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (१६ ऑक्‍टोबर) सकाळी पावणेनऊच्या सुमारास घडली. त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. खून केल्याने तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. नाशिक येथील जेलरोड कारागृहातून त्याला १६ […]

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण येथील खुल्या कारागृहातील कैदी सुभाष रमेश केंगार (वय ३२, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) याने जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (१६ ऑक्‍टोबर) सकाळी पावणेनऊच्या सुमारास घडली. त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. खून केल्याने तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.

नाशिक येथील जेलरोड कारागृहातून त्याला १६ फेब्रुवारी २०२४ रोजी उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी पैठणच्या खुल्या कारागृहात आणण्यात आले होते. बुधवारी सकाळी कारागृहाच्या शेतातील सोयाबीन काढण्यासाठी १२ कैद्यांना पाठविण्यात आले होते. मात्र ११ कैदी काम करत होते, केंगार गायब होता. जेल अधिकाऱ्यांनी शोध सुरू केला असता जायकवाडीच्या उजव्या कालव्यातील सिमेंटच्या कठड्यावर त्याचा मृतदेह आढळला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला. अधिक तपास केला जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software