खुलताबादेत शांतता समिती बैठक; सामाजिक एकोप्याची परंपरा कायम राखू, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : आगामी काळात गणेशोत्सव व जरजरी बक्ष उर्स महोत्सव होणार असून, खुलताबाद शहरातील नागरिकांनी नेहमी जपलेली परंपरा कायम राखून सर्व उत्सव सामाजिक एकोप्याने सहभागी होऊन साजरे करू, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारी (३ सप्टेंबर) खुलताबाद येथे केले. जर जरी बक्ष यांचा ७३८ वा उर्स महोत्सव व गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर शांतता समितीची […]

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : आगामी काळात गणेशोत्सव व जरजरी बक्ष उर्स महोत्सव होणार असून, खुलताबाद शहरातील नागरिकांनी नेहमी जपलेली परंपरा कायम राखून सर्व उत्सव सामाजिक एकोप्याने सहभागी होऊन साजरे करू, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारी (३ सप्टेंबर) खुलताबाद येथे केले.

जर जरी बक्ष यांचा ७३८ वा उर्स महोत्सव व गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर शांतता समितीची बैठक पंचायत समिती सभागृहात पार पडली. पोलीस अधीक्षक डॉ. विनय राठोड, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, तहसीलदार स्वरूप कंकाळ, मुख्याधिकारी विक्रम दराडे, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, गट विकास अधिकारी प्रकाश नाईक, शांतता समिती सदस्य, सरपंच, पोलीस पाटील आदी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले, की सर्वधर्म हे मानवतेची शिकवण देतात. सामाजिक एकोपा हा विचार प्रत्येक धर्माचा गाभा आहे. सर्व धर्मियांनी परस्परांच्या उत्सवात आनंदाने सहभागी होत उत्सवाचा आनंद वृद्धीगत करावा. उत्सव काळात असामाजिक तत्वाना पायबंद घालणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. खुलताबाद तालुका व शहराची सामाजिक एकोप्याची परंपरा कायम राखू या, असे आवाहन स्वामी यांनी केले.

पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांनी सांगितले की, मोबाईल फोनच्या अवाजवी व चुकीच्या वापरामुळे अनेकदा अफवा व चुकीची माहिती पसरवली जाते. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. प्रत्येक पालकाने आपली मुलं मोबाईलवर काय शेअर करतात यावर लक्ष ठेवले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. शांतता समिती सदस्य आबीद जहागीरदार, परसराम मालोदे, विकास कापसे, ज्ञानेश्वर नलावडे, दिनेश सावजी, अरुण तंबारे, पोलीस पाटील रेखा गोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी केले. सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी तर गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी आभार मानले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software